Jeep आणतेय स्वस्तात मस्त SUV; सुरू केली तयारी, Tata, मारुतीवर पडणार भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 13:21 IST
1 / 9भारतीय बाजारपेठेत TATA आणि Maruti Suzuki या दोन स्वदेशी कंपन्यांचा मोठा बोलबाला आजच्या घडीला पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील वाहन विक्रीची आकडेवारी पाहिल्यास या दोन कंपन्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले दिसते. 2 / 9TATA आणि Maruti Suzuki च्या कारची रेंज खूप मोठी असून, यातील अनेक कार प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. याला टक्कर देण्यासाठी अनेकविध कंपन्या कंबर कसून प्रयत्न करत असले, तरी या काही कारची लोकप्रियता आणि खप तसुभरही कमी होताना दिसत नाही. 3 / 9देशातील कार सेगमेंटमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बंपर डिमांड आहे. या सेगमेंटमध्ये देसी कार कंपनी टाटा मोटर्सची जबरदस्त एसयूव्ही टाटा नेक्सॉनची सर्वांत जास्त विक्री होते. यासोबतच मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर्स आणि महिंद्रा सोबत किआ मोटर्स, निसान आणि रेनॉल्ट सारख्या कंपन्याच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही पॉप्यूलर झाल्या आहेत.4 / 9Jeep ही अमेरिकी ऑटोमोबाइल कंपनी आता नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. याआधी जीप आपल्या नवीन ७ सीटर एसयूव्ही जीप मेरिडियन आणि Compass Trailhawk सुद्धा लाँच करणार आहे.5 / 9मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, जीप भारतात कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बंपर डिमांड पाहून मेड इन इंडिया एसयूव्ही आणण्याची तयारी करीत आहे. ज्यात Groupe PSA चे कॉमन मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (CMP) वर डेव्हलप केले जाईल. जीपची अपकमिंग स्वस्त एसयूव्ही मध्ये ९० टक्के कंपोनेंट्स लोकल असतील, असे सांगितले जात आहे.6 / 9Jeep स्वस्त एसयूव्ही पाहायला शानदार असेल तसेच याचे फीचर्स खूपच जबरदस्त असतील. या एसयूव्ही मध्ये जीपची सिग्नेचर ७ स्लॅट ग्रिल, एलईडी हेडलँम्प, एलईडी डीआरएल, एलईडी टेललँप, अलॉय व्हील्ज आणि स्पोर्टी ब्लॅक क्लॅडिंग पाहायला मिळतील.7 / 9Jeep अपकमिंग कॉम्पॅक्ट एसयूव्ही संबंधी म्हटले जात आहे की, हे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची पहिली अशी कार असेल ज्यात ऑल-व्हील ड्राइव (AWD) सिस्टम वर बेस्ड असेल. ज्यात १.२ लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल.8 / 9Jeep अपकमिंग कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये ५ स्पीड मॅन्यूअल सोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन पाहायला मिळतील. भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कारची डिमांड वाढत आहे. 9 / 9इलेक्ट्रिक कार सेगमेंटचा विचार केल्यास टाटा मोटर्स आघाडीवर असून, टाटाच्या दोन इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहेत.