Best CNG Car : 7 सीटर MPV पासून सेडानपर्यंत, CNG मध्ये बेस्ट आहेत या 5 कार; 35KM हूनही अधिक मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:20 IST
1 / 7पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी (CNG) वाहने अधिक फ्यूल एफिशिएंट असतात. एवढेच नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते अधिक चांगले असतात. मारुतीपासून ते हुंदाई आणि टाटा सारख्या दिग्गज कंपन्याही आपल्या काही मॉडेल्ससह फॅक्ट्री फिटेड सीएनजीची सुविधा देत आहेत. 2 / 7दिल्लीमध्ये सीएनजीचा दर 56.01 रुपये प्रती किलोग्रॅम एवढा आहे. तर पेट्रोलचा दर 95.41 रुपये प्रती लीटर आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रती लीटर आहे. जर आपणही आपल्यासाठी एखादी सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल तर, आम्ही आपल्यासाठी पाच 5 बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत. 3 / 7Tata Tiago - टाटा मोटर्सने त्यांच्या Tiago हॅचबॅक कारचे CNG व्हेरिअंट नुकतेच लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे, ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार आपल्याला बेस, मिड आणि टॉप व्हेरिअंटमध्ये मिळेल. याची किंमत 6.09 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 7.52 लाख रुपयांपर्यंत जाते.4 / 7Hyundai Santro - Hyundai Santro मध्ये 1.1 लीटर पेट्रोल इंजिन आहे. यासोबत CNG किटचा पर्यायही देण्यात आला आहे. या कारची किंमत 6.38 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. सँट्रो सीएनजीला स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल बटण, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसारखे फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. 5 / 7Hyundai Aura - सीएनजी किटसह हॅचबॅक बऱ्याच आहेत, पण स्टाइलिश लुकमधील सेडानपैकी एक आहे ह्युंदाई ऑरा. पेट्रोल इंजिनसह असलेल्या या कारची फाईट मारुती सुझुकीच्या डिझायर आणि होंडा अमेज सोबत असते. ह्युंदाई ऑरा सीएनजीची किंमत 7.74 लाख रुपये एवढी आहे. ही कार सीएनजीसह 28KM पर्यंतचे मायलेज ऑफर करते.6 / 7Maruti Suzuki Celerio - जर आपल्याला उत्तम मायलेज असलेली सीएनजी कार हवी असेल, तर मारुती सुझुकी सेलेरियो हा एक उत्तम पर्याय ठरेल. CNG पर्यायातील मारुती सुझुकी सेलेरियो ही 35.6 किमी/किलो एवढे मायलेज देईल. मात्र, या कारमध्ये CNG किट केवळ VXI व्हेरिअंटमध्येच मिळू शकेल. या कारची किंमत 6.58 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. या कारला 999ccचे इंजिन देण्यात आले आहे. याशिवाय सेंट्रल लॉकिंग, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंग मिरर आणि स्प्लिट-फोल्डिंग रिअर सीट्सदेखील देण्यात आले आहे. तसेच, सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, एबीएस आणि रिअर पार्किंग सेन्सरही देण्यात आले आहे.7 / 7Maruti Suzuki Ertiga - हॅचबॅक आणि सेडान व्यतिरिक्त, तुम्हाला सीएनजीसह सात सीटर कार हवी असेल तर, मारुती सुझुकी एर्टिगा हा एक उत्तम पर्याय आहे. या कारचे सीएनजी व्हेरिअंट 1 किलोमध्ये 26 किमी पेक्षा अधिक धावते. Maruti Suzuki Ertiga CNG ची किंमत 9.87 लाख रुपये एवढी आहे. या MPV मध्ये सेंट्रल कन्सोल-माउंटेड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वुडन फिनिश असलेला डॅशबोर्ड, अॅडजस्टेबल सेकंड-रो एसी आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर्स आहेत.