क्विडची मोठी बहीण आली; रेनॉल्ट ट्रायबर भारतात लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 17:48 IST
1 / 14क्विड आणि कॅप्चरमधील पोकळी भरून काढण्यासाठी रेनॉल्टने भारतासह जगभरात एकाचवेळी Renault Triber कार लाँच केली आहे. 2 / 14ही चार मीटर लांबीची सात सीटर कार असून ही कार बहुतांशी क्विडसारखीच दिसते. 3 / 14ट्रायबर ही कार क्विडचा CMF-A चा प्लॅटफॉर्म वापरते. या कारमध्ये नवीन हेडलाईट्स, नवीन ग्रील आणि बोनट देण्यात आले आहे. 4 / 14कंपनीने ट्रायबरमध्ये मोकळ्या जागेवर जास्त काम केले आहे. ही कार भारतात कधी उपलब्ध होणार याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.5 / 14या कारची किंमत एक्सशोरुम 5.3 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. 6 / 14Renault Triber मध्ये 999 सीसी, 1 लीटरचे तीन सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6250 आरपीएमवर 72 पीएसची ताकद आणि 3500 आरपीएमवर 96 एनएमचा टॉर्क उत्पन्न करते.7 / 14हे इंजिन 5 स्पीड ट्रान्समिशनने लेस आहे. याशिवाय यामध्ये 5 स्पीड Easy-R AMT चा पर्यायही आहे. 8 / 14ट्रायबरच्या पुढील चाकांना Mcpherson strut आणि पाठीमागे Torsion Beam सस्पेंशन देण्यात आले आहे. 9 / 14Renault Triber ची लांबी 3990 मिमी, रुंदी 1739 मिमी आणि उंची 1643 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2636 मिमी आहे, तर ग्राऊंड क्लिअरंस 182 मिमी आहे. तसेच 40 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.10 / 14इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये 3.5 इंचाची LCD स्क्रीन देण्यात आली आहे. तर 7.9-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. 11 / 14Kwid, Lodgy, Duster आणि Captur मध्ये 7 इंचाची स्क्रीन आहे. 12 / 14Renault Triber मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, एबीएस आणि स्पीड वॉर्निंग सिस्टिम देण्यात आली आहे.13 / 14वरच्या व्हेरिअंटमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि जास्त एअरबॅग मिळतील. 14 / 14वरच्या व्हेरिअंटमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि जास्त एअरबॅग मिळतील.