एकदाच टाकी फुल करा अन् ७०० किमी चालवा; केवळ ५ हजारात घरी नेऊ शकता, EMI किती? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 20:12 IST
1 / 7गुढीपाडवा जवळ आलाय, त्यात जर तुम्ही एखादी नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होंडानं स्वस्तात मस्त बाईक बाजारात आणली आहे2 / 7भारतीय बाजारपेठेत बऱ्याचदा ग्राहक अशा बाईकच्या शोधात असतात जी त्यांच्या खिशाला परवडेल आणि चांगली मायलेज देईल. त्यातच Honda SP 125 बाईक चांगला पर्याय ठरू शकतो. ज्यात किफायतशीर बजेटसह मायलेजही उत्तम आहे. 3 / 7Honda SP 125 ची भारतीय बाजारपेठेत एक्स शो रूम किंमत ८५ हजार १३१ रूपयांपासून सुरू होऊन ८९ हजार १३१ रूपयांपर्यंत जाते. होंडाची ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये येते, एक ड्रम आणि डिस्क ब्रेक दिले जातात. या बाईकमध्ये एबीएससह डिस्क ब्रेकची सुविधा आहे4 / 7होंडा SP 125 च्या बेस व्हेरिएंटची किंमत दिल्ली, मुंबईत १ लाखाच्या आसपास आहे. त्यात ८ हजार आरटीओ आणि ६ हजार इन्शुरन्सचा समावेश आहे. केवळ ५ हजारात तुम्ही ही बाईक डाऊनपेमेंट देऊन खरेदी करू शकता. 5 / 7डाऊन पेमेंटनंतर तुम्हाला ९७ हजारापर्यंत कर्ज मिळू शकेल. जर १०.५ टक्के व्याजदराने पुढील ३ वर्षासाठी तुम्ही कर्ज घेतले तर त्यासाठी दर महिना ३ हजार १६७ रूपये EMI भरावा लागेल. ही किंमत शहर आणि डिलरशिप आधारे बदलत जाईल.6 / 7होंडाच्या या बाईकमध्ये १२३.९४ सीसी सिंगल सिलेंडर बीएस ६, OBD 2 कंपलिएंट PGMFI इंजिन मिळते. जी 8KW पॉवर आणि 10.9 NM टॉर्क जेनरेट करण्याची क्षमता ठेवते. 7 / 7कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक एक लीटर पेट्रोलमध्ये ६५ किमी अंतर पार करू शकते. जर तुम्ही एकदा टाकी फुल केली तर ती जवळपास ७०० किमी पल्ला गाठेल असं कंपनीने म्हटलं आहे.