शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 19:06 IST

1 / 5
Most Cheapest Sedan: भारतात कमी बजेटमध्ये लग्झरी अनुभव देणाऱ्या अनेक सेडान कार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या सेडान कार्सची किंमत सुमारे 6 लाख रुपयांपासून सुरू होते. कमी किंमत, चांगला मायलेज, सेफ्टी फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियरमुळे या कार्स मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चांगला पर्याय ठरत आहेत. या लिस्टमध्ये टाटा, हुंडई आणि मारुतीच्या लोकप्रिय सेडान कारचा समावेश आहे.
2 / 5
Tata Tigor- ही या यादीतील सर्वात स्वस्त सेडान कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 5.54 लाख रुपये पासून सुरू होते, तर ऑन-रोड किंमत सुमारे 6.37 लाख रुपये जाते. ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असून, पेट्रोल व्हेरिएंट 19.2 kmpl आणि CNG व्हेरिएंट 26 km/kg मायलेज देते. या कारला Global NCAP 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यात 6 एअरबॅग आणि ABS मिळते.
3 / 5
Hyundai Aura- ही स्टायलिश आणि फीचर-लोडेड सेडान कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपये पासून सुरू होते, तर ऑन-रोड किंमत सुमारे 6.24 लाख रुपये आहे. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळते, जे 83 PS पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. ही करा 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स, अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारचे मायलेज 17.5 kmpl(पेट्रोल) आणि 22 km/kg(CNG) आहे.
4 / 5
Maruti Dzire- ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेडान कारपैकी एक आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.25 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत सुमारे 7.26 लाख रुपये आहे. या कारमध्ये 9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay, वायरलेस फोन चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रियर AC व्हेंट्स आणि स्मार्ट की सारखे फीचर्स मिळतात. ही कार फीचर्स आणि कम्फर्टसाठी सर्वोत्तम पर्याय मानली जाते.
5 / 5
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सेडान कार घ्यायची असेल तर, सेफ्टीसाठी Tata Tigor, कम्फर्ट आणि मायलेजसाठी Hyundai Aura, तर फीचर्स आणि प्रीमियम अनुभवासाठी Maruti Dzire घेण्यास काही हरकत नाही.
टॅग्स :carकारMaruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाईTataटाटा