ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
1 / 5सुमारे दीडशे वनकर्मचाऱ्यांनी अंजनसिंगी येथील मदर तेरेसा इंग्लिश स्कूललाच तात्पुरते कार्यालय आणि निवास बनविले आहे. त्यांना येथूनच आदेशित केले जात आहे.2 / 5सहा दिवसांपासून खुंटाला बांधलेला बैल दुचाकीला बांधून चारण्यासाठी नेताना शेतकरी. निदान दुचाकीच्या आवाजाला वाघ घाबरेल, ही भाबडी आशा त्याला आहे.3 / 5वाघाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँक्यूलायझरने सज्ज दोन कर्मचारी पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून, सावज म्हणून पिंजºयाभोवती म्हशी बांधण्यात आल्या आहेत. वाघ त्यांच्यावर झडप घालताच कर्मचारी त्यांच्याकडील गनने वाघाला बेशुद्ध करतील, अशी ही योजना आहे. 4 / 5वाघाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी शिवारातून परतणाऱ्या शेतमजुरांना सायंकाळच्या सुमारास लवकरात लवकर घर गाठण्याची विनंती केली.5 / 5शार्प शूटरचे जागते रहो. त्यांच्याकडील गन ट्रँक्यूलायझरने सज्ज असून, वाघाची प्रतीक्षा होत आहे.