वाडी दमई येथे कोरोनाने आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून ५० कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यातील अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील युवक सतर्क झाले आहेत. त्याआनुषंगाने त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ व ‘मी जबाबदार’ ही जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी गावकऱ्यांचे तापमान तपासणी, त्यांच्या नोंदी घेणे, संशयितांची कोविड चाचणी करण्यास सांगणे, बाधितांवर उपचार, त्यांचे विलगीकरण आणि त्यांना आहाराबाबत सजग करण्यात आले. तसेच बाधितांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येणे, कोविडबाबतची भीती दूर करणे आदी माहिती या मोहिमेत देण्यात येत आहे. ही जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीसपाटील लक्ष्मणराव बीडकर, सरपंच अमोल तरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गायकवाड, पूजा तरवटे, शिवराज बोरामणे, दीपक बिडकर, ओमकार तरवटे, वैभव कड, माउली तरवटे, शरद तरवटे, संतोष बिडकर, सुनील तरवटे, बालाजी गायकवाड, विठ्ठल तरवटे, अमोल तरवटे, सोमनाथ तरवटे, कृष्णा तरवटे, सुधाकर गायकवाड, डॉ. उमाकांत विभुते, प्रभाकर बारहाते, विलास घोडके, विजयकुमार बिडकर, संतोष वाटोडे, महादू वाटोडे, अंबादास वाटोडे, राम भुरे, गजानन विभुते, नवनाथ बारहाते आदी परिश्रम घेत आहेत.
वाडी दमई येथे युवकांची जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:17 IST