शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

येलदरी प्रकल्पात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे. मागील वर्षी येलदरी ०प्रकल्पात १०० टक्के ...

मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यावर्षी पाण्याची टंचाई कमी झाली आहे. मागील वर्षी येलदरी ०प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला होता; परंतु रब्बी आणि खरीप हंगामासाठी या प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले. २२ एप्रिल रोजी या प्रकल्पात ५५०.३०० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ६८ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे, येत्या दोन-चार दिवसांत या प्रकल्पातील पाणी उन्हाळी हंगामासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे आणखी पाणीसाठा घटण्याची शक्यता आहे.

येलदरी प्रकल्पाच्या पाण्यावर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सुमारे ३०० ते ३५० योजना चालवल्या जातात. या योजनांसाठीही येलदरी प्रकल्पातून पाणी द्यावे लागणार आहे. सध्या अनेक भागात भूजल पातळी कमी झाल्याने प्रकल्पाच्या पाण्यावरच या गावांची भिस्त आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे.

सिद्धेश्वर प्रकल्प कोरडाठाक

येलदरी धरणाच्या खालच्या बाजूला असलेला हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्प मात्र कोरडाठाक आहे. या प्रकल्पाची एकूण पाणी साठवणक्षमता ५.३ टीएमसी आहे; परंतु प्रत्यक्षात प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठाच शिल्लक नाही. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी येलदरी प्रकल्पातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे येलदरी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत.