शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यातील सिंचन विहिरींच्या ५८ कामांना कार्यारंभ आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 19:40 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देगतवर्षी छाननी समितीने ६५ सिंचन विहिरींना मान्यता दिली होती़या कामांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर आता पंचायत समितीस्तरावरून कामे सुरू झाली आहेत़ ५८ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़

पाथरी (परभणी) :  महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या ६४ सिंचन विहिरींपैकी ५८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांवर जिओ टॅगींग करून कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर ९१ सिंचन विहिरीला नव्याने मान्यता देण्यात आली आहे.

मनरेगा योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर सिंचन विहिरींची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत़ योजनेच्या अंमलबजावणीसाठीही दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने छाननी समितीची मंजुरी अनिवार्य केली होती़ छाननी समितीच्या बैठका वेळेत होत नसल्याने दोन वर्षांत कामे सुरू होवू शकली नव्हती़ गतवर्षी छाननी समितीने ६५ सिंचन विहिरींना मान्यता दिली होती़ या कामांना जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर आता पंचायत समितीस्तरावरून कामे सुरू झाली आहेत़ ५८ सिंचन विहिरींच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत़ यातील ४९ कामांचे जिओ टॅगींग करण्यात येऊन कामाला सुरुवात झाली आहे.

योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक मान्यता व कामाचे अंतिमीकरण करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याने जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांनी मनरेगाच्या कामासाठी अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत़ पाथरी, मानवत, सेलू या तीन तालुक्यांसाठी तांत्रिक मान्यता पूर्णत्वाचे दाखले देण्यासाठी जिंतूर येथील लघुसिंचन उपविभागाचे उपअभियंता बी़व्ही़ मिरासे यांच्या नावाने आदेश काढले आहेत़ त्यामुळे नवीन ९१ कामांना तांत्रिक मान्यता देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे़ 

छाननी समितीची १७९ कामांना मान्यतामनरेगा योजनेंतर्गत कार्यरत असणार्‍या उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीने १७९ कामांना मान्यता दिली आहे़ यात अमृतकुंड शेततळे ०९, निर्मल शौचालय २७, विहिर पुनर्भरण ५२, अहिल्यादेवी सिंचन विहिर ९१ या कामांचा समावेश आहे़ 

२६ प्रस्तावात त्रुटी

पाथरी पंचायत समितीने छाननी समितीकडे सिंचन विहिरींचे प्रस्ताव सादर केल होते़ त्यापैकी १७९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे़ तर २६ प्रस्ताव आढळून आले आहेत़ तर दोन प्रस्ताव अपात्र ठरले गेले आहे़ 

कुशल-अकुशलची देयके अडकली

योजनेच्या कामांना तालुकास्तरावर नव्याने सुरुवात झाली असली तरी मागील कामांचे कुशल देयके सहा महिन्यांपासून आॅनलाईन उपलब्ध झाले नाहीत़ आता तर गेल्या १५ दिवसांपासून अकुशल देयके आॅनलाईन उपलब्ध झाले नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीस अडचणी निर्माण होत आहेत़ 

अंमलबजावणी सुरू झाली आहे़मनरेगा अंतर्गत छाननी समितीने मंजुरी दिलेल्या सर्वच कामांची पंचायत समितीस्तरावरुन अंमलबजावणी सुरू झाली आहे़ वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.- बी.टी. बायस, गटविकास अधिकारी, पाथरी

कामांना गती आली आहे़ मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरींच्या कामांना आता चांगली गती आली आहे़ सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनही कामाला लागले असून, मंजुराना काम व लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे़ योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.- शिवकन्या ढगे, सभापती, पंचायत समिती