शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ११ केंद्रांचा कारभार पाहणार महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:50 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या मतदार संघात ११ सखी मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते सेवकांपर्यंतचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने या मतदार संघात ११ सखी मतदान केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राध्यक्षांपासून ते सेवकांपर्यंतचा सर्व कारभार महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीत निवडणूक विभागाने वेगवेगळे बदल करून समाजातील प्रत्येक घटकाला निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच सखी मतदान केंद्र ही संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात असे ११ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिंतूर, परभणी आणि परतूर मतदार संघात प्रत्येकी १, गंगाखेड-पाथरी मतदार संघात प्रत्येकी ३ आणि घनसावंगी मतदार संघात दोन सखी मतदान केंद्र कार्यरत असतील.परभणी शहरामध्ये एकता कॉलनी भागातील गांधी विद्यालयाच्या मतदान केंद्राला सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले आहे.या मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्षा म्हणून विजया पवार यांची नियुक्ती झाली असून मतदान केंद्र अधिकारी म्हणून सुप्रिया श्रीमाळी, छाया गायकवाड, विद्या लटपटे काम पाहणार आहेत. त्याच प्रमाणे निशा कापसे यांची सहाय्यक अधिकारी म्हणून तर वैशाली पेटकर यांची सेविका म्हणून या केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीparbhani-pcपरभणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWomenमहिला