शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कधी करताय, लग्नाला कोणी मुली देईनात ओ..!; आमदारांसमोर ग्रामस्थ झाला आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 19:33 IST

पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे.

पाथरी ( परभणी): बैलांना पाच एवजी दहा कोरडे मारावे लागतात, मुलांना कोणी मुली देईनात किती आमदार आले खासदार आले मात्र आमच्या रस्त्याचा प्रश्न सुटला नाही. अगोदर रस्त्याचा प्रश्न सोडवा, असे जाहीर कार्यक्रमात आमदाराला डोंगर गावाच्या ग्रामस्थांनी सुनावले. यावेळी एका गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथेचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

पाथरी तालुक्यातील डोंगरगाव या गावाला मुख्य रस्त्याला जोडणारा 3 किमी रस्ता करण्यात यावा अशी अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी आहे. यासाठी ग्रामस्थांनी निवेदने, आंदोलने केली पण यश आले नाही. मागील विधानसभा निवडणुकीत गावाने रस्त्यासाठी निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. रस्ता नसल्याने गावात बस येत नाही. यामुळे अनेक अडचणीला ग्रामस्थ सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी 3 किमीची पायपिट करावी लागत. कोणी आजारी पडले तर मोठी तारांबळ उडते. रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी पाथरी मतदार संघाचे आमदार सुरेश वरपूडकर डोंगरगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम सुरू असताना गावातील एक नागरिक मध्येच उभा राहिला. रस्त्याची मागणी करत त्यान आमदारांवर प्रश्नांचा भडिमार केला. ग्रामस्थांनी व्यथा मांडताना तो म्हणाला, रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे नागरिकांचे हाल होत आहेत. खराब रस्त्यावरून  बैलगाडी न्यायची तर बैलाला दहा चाबूक जास्तीचे मारावे लागतात. ऐवढेच काय, रस्ता नसल्याने गावातील मुलांचे लग्न होत नाहीत. मुलीकडील मंडळी नको बाबा म्हणत स्थळ टाळतात. यापूर्वी अनेक खासदार आमदार आले गेले पण रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, असेही तो म्हणाला. 

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा