शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माझा संतोष देशमुख झाला तर? बारावीच्या परीक्षा केंद्रसंचालकांनी मागितले सशस्त्र पोलिस संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:38 IST

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय? कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे.

परभणी : जिल्ह्यात कॉपीमुक्तीमुळे केंद्रसंचालकांची अदलाबदल केली. परभणीतील डीएसएम कॉलेजचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी केंद्रसंचालक म्हणून जायची तयारी आहे. मात्र त्यासाठी मला घरापासून ते केंद्र व तेथून घरापर्यंत सशस्त्र पोलिस संरक्षण देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जमादार यांच्याकडे काल केली.

कॉपीमुक्त अभियानामुळे यंदा परभणी जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्र असलेल्या ठिकाणची मंडळी हादरली आहे. मात्र दुसरीकडे नवीन केंद्रावर संचालक म्हणून जाणाऱ्या अनेकांनाही भीती वाटत आहे. उपप्राचार्य विजय घोडके यांनी प्रातिनिधीक स्वरुपात भावना मांडली. ते म्हणाले, शासनाने कॉपीमुक्ती हा मुद्दा अजेंड्यावर घेतला तर त्यातील भयावह स्थिती त्यांना माहिती आहे. मग उद्या आम्ही कॉपीमुक्ती करून संबंधितांच्या उद्योगात अडचण ठरणार असेल तर सुरक्षेचा धोका आहे. आमच्या कुटुंबाचे आम्ही आधार आहोत. जर कॉपीमुक्तीसाठी आमची नियुक्ती केली तर कॉपी होवू न देणे ही आमची जबाबदारी राहणार आहे. मात्र त्यासाठी आम्हाला सुरक्षाही पुरवावी, अशी रास्त मागणी आहे.

एका उपद्रवी केंद्राचे संचालक दुसऱ्याला; मग फायदा काय?जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कॉपीमुक्तीसाठी वारंवार घेत असलेल्या बैठकांवर पाणी फेरण्याचे काम शिक्षण विभागातून होत आहे. एका उपद्रवी केंद्राचा संचालक दुसऱ्या उपद्रवी केंद्रावर व तेथील तिसऱ्या उपद्रवी केंद्रावर नेमून ही साखळी वेगळ्या पद्धतीने कायम ठेवण्याचा चंग बांधल्याचे दिसत आहे. त्यामुळे कॉपीमुक्तीसाठी या नियुक्त्या फारशा उपयोगी ठरणार नाहीत, असेच दिसते. कॉपीमुक्त सेंटरवरील दुसऱ्या शिक्षकांनाही केंद्रप्रमुख म्हणून नेमण्यासाठी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही.

कॉपीमुक्त केंद्रातील प्राध्यापक नेमा जेथे कॉपी केली जात नाही व नियमित वर्ग भरतात, अशा शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांना केंद्रसंचालक नेमले तर त्याचा फायदा होवू शकतो. कारण या मंडळींनी मेहनत घेवूनही त्यांचा तेवढा निकाल लागत नाही. उपद्रवी केंद्राच्या ठिकाणचा निकाल कायम उच्च कोटीचा असतो. शिवाय विद्यार्थ्यांचा ओढाही उपद्रवी केंद्रांकडेच वाढत आहे. त्यामुळे इमानदारीने काम करूनही नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती या मंडळींना आहे. त्यामुळे ते केंद्रसंचालक झाले तर निदान या एका कारणाने तरी ते विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखतील.

८० च्या तुकडीत २५० विद्यार्थी कसे?जेव्हा एखाद्या शाळेत ८० विद्यार्थ्यांची तुकडी असेल तर तेथे २५० विद्यार्थी परीक्षेला कसे बसू शकतात. विभागीय मंडळ सोडा शिक्षण विभागाकडूनही साधी याची चौकशी का होत नाही? हा प्रश्न आहे.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाparabhaniपरभणीexamपरीक्षा