छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजाचे पूजन सर्वांच्या हस्ते व्हावे, यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही यात्रा काढण्यात आली आहे. जामखेड येथील भूईकोट किल्ला ते सिंदखेडराजा व परत जामखेड अशी ही यात्रा काढली जाणार आहे. ३७ दिवसाच्या यात्रेमध्ये ६ राज्यातून १२ हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधून यात्रा प्रवास करणार आहे. परभणी शहरासह जिल्ह्यात या यात्रेचे स्वागत शनिवारी करण्यात आले. वसमत मार्गे आलेली यात्रा शहरातील खानापूर फाटा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे दाखल झाली. शिवप्रेमी व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यानंतर स्टेशन रोड, क्रांती चौक, शिवाजी चौक मार्गे यात्रा शहरात मार्गस्थ झाली. यानंतर सायंकाळी यात्री पाथरीकडे रवाना झाली. यावेळी नागरिक, महिला व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वराज्य ध्वज यात्रेचे परभणीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:19 IST