शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत राज्यराणी एक्सप्रेसचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:28 IST

नांदेड ते मुंबई या नव्याने सुरु झालेल्या राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेचे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वेस्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नांदेड ते मुंबई या नव्याने सुरु झालेल्या राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेचे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परभणीरेल्वेस्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.नांदेड ते मुंबई ही राज्यराणी एक्सप्रेस १७६११/१७६१२ रेल्वे १० जानेवारीपासून सुरु झाली आहे. या रात्री १० वाजता नांदेड येथे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास परभणी रेल्वे स्थानकावर ही रेल्वेगाडी दाखल झाली. यावेळी मराठवाडा प्रवासी महासंघाच्या वतीने मॅकेनिकल इंजि.स्वामी, लोको पायलट चितळे, स्टेशन मास्तर देविदास भिसे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. तसेच पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी महासंघाचे अरुण मेघराज, रितेश जैन, श्रीकांत गडप्पा, मोहन प्रकाश, अजय कांबळे, नीलेश कामटीकर, समृद्धी कामटीकर, अब्दुल बारी, टी. कांबळे, अ‍ॅड. पुरुषोत्तम अटल, शहाजाद शेख आदींची उपस्थिती होती.पूर्णेतही रेल्वेचे स्वागतराज्यराणी एक्सप्रेसचे पूर्णा येथेही स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वेचे चालक दिनेशकुमार सिंग, सहाय्यक चालक बबलू कुमार, गार्ड आर.आर.मीना, स्टेशन अधीक्षक महेंद्र निकाळजे, लोको निरीक्षक अहमद साहब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.हरिभाऊ पाटील, डॉ.गुलाब इंगोले, अ‍ॅड.अब्दुल सईद, संतोष एकलारे, शाम कदम, लक्ष्मीकांत कदम, सतीश टाकळकर, प्रमोद मुथा, गजानन हिवरे, आनंद अजमेरा, किरण कुल्थे, सुनील अवसरमोल, रौफ कुरेशी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे