शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेलू (परभणी)येथे गजल, मुशायºयास रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:16 IST

शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद आणि गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी गझल, मुशायरा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, एल्गार सामाजिक, साहित्य परिषद आणि गझलनिष्ठ प्रतिष्ठानच्या वतीने सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात मराठी गझल, मुशायरा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गझलकार नाना बेरगुडे मंचावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनंदाताई पाटील उपस्थित होत्या. प्रा.डॉ.अशोक पाठक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सर्जेराव लहाने, नगरसेवक रहिम खान पठाण, कॉ. अशोक उफाडे आदींची उपस्थिती होती. यावेळी ‘भावास सोबतीला घेऊन चालले मी, पुसले मला जगाने हा यार कोण आहे’, ही गझल सुनंदाताई पाटील यांनी सादर करुन पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन मांडला. नारायण सुंदरसे यांनी ‘तू वेदना झालीस, अन् तू अस्वांची प्रार्थना, गाऊन, घेतो मी तुला गझलेतल्या शब्दांसवे’ ही गझल सादर केली. भूषण आहीर यांनी ‘आजन्म वेदनने कित्येक वार केले, आकार घेतला मग माझ्यातल्या कविने’ तर सचिन तारु यांनी ‘भूक हसता खोल पोटी, दैवही घेते कसोटी’ ही गझल सादर केली. आत्तम गेंदे यांनी ‘बाप नभाला बघुनी विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पुष्पक नाही हुडक तो ढग शोधत असतो’, ही गझल सादर केली. तर अश्विनी विटेकर यांनी ‘वेदनेचे शेत आहे, दु:ख ताजे देत आहे’, ही गझल सादर केली. रत्नाकर जोशी यांनीही गझल सादर केली. सुरेश हिवाळे, शरद ठाकर, दिगंबर रोकडे या कवींनीही गझल सादर करुन या मनमुराद हसविले.या कार्यक्रमात प्रा.के.डी. वाघमारे यांना राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अरविंद सगर यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ जाधव यांनी आभार मानले.