शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण?; वाळू ट्रॅक्टरवरून भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:12 IST

गणेश रोकडे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची फिर्याद

पालम (जि. परभणी) : अवैधरीत्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात आणल्यानंतर हे ट्रॅक्टर सोडून देण्याच्या कारणावरून तहसीलदार ज्योती चव्हाण व नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांच्यासोबत वादावादी करून त्यांच्या टेबलवरील कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे यांच्यासह तीन जणांवर पालम पोलीस ठाण्यात गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

या संदर्भात पालम तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मंदार इंदूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘२० फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात कामकाज करीत असताना दुपारी ३़४५ च्या सुमारास तहसीलदार ज्योती चव्हाण यांच्या कक्षासमोर ७ ते ८ व्यक्ती आले़ त्यामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे, चोरवड येथील रुपला सीताराम राठोड व सीताराम रुपला राठोड हे कोणतीही पूर्वसूचना न देता तहसीलदार चव्हाण यांच्या कक्षात आले व रोकडे यांनी आमचा कार्यकर्ता सीताराम राठोड याचे ट्रॅक्टर का पकडले, असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व तुमचा इंदूरकर का फिंदूरीकर कुठे आहे, अशी विचारणा केली़ त्यावेळी इंदूरकर यांनी पुढे येऊन मीच इंदूरकर असल्याचे सांगितले़ त्यावर रोकडे यांनी तू मला ओळखत नाहीस का, माझ्यावर यापूर्वी ४३ गुन्हे दाखल आहेत, असे सांगितले़’

आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण? तहसीलदार चव्हाण यांनी शांतता राखा, हे शासकीय कार्यालय आहे, असे रोकडे यांना सांगितले असता, त्यांनी आम्ही कलेक्टरला गिनत नाही, तुम्ही कोण? उद्या तहसीलवर मोर्चा आणतो़ तुमचे आॅफिस बंद पाडतो, असे म्हणत हातवारे करीत रोकडे व त्यांचे साथीदार अंगावर धावून येऊ लागले़, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी रुपला राठोड यांनी इंदूरकर यांना तू काय कागदं काळे करीत बसलास, असे म्हणून त्यांच्या टेबलवर ठेवलेले शासकीय कागदपत्रे हिसकावण्याचा प्रयत्न केला़ यावेळी अव्वल कारकून प्रकाश बोराडे, भारत घनसावंत, लिपिक वैजनाथ फड हे कक्षात दाखल झाले़ त्यांनी रोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ याबाबत पालम पोलिसांत इंदूरकर यांनी गुरुवारी मध्यरात्री फिर्याद दिली. यावरुन गणेश रोकडे, रुपला सीताराम राठोड व सीताराम रुपला राठोड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी