शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीमध्ये आम्ही फक्त निमंत्रक; उद्याच्या बैठकीला जाणार नाही: प्रकाश आंबेडकर

By मारोती जुंबडे | Updated: February 26, 2024 18:14 IST

प्रकाश आंबेडकर का म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे.

परभणी: महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी झाली नसून केवळ आम्ही निमंत्रक आहोत. आम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्यामध्ये ३९ जागांवर कोणी लढायचे याची सहमती झाली आहे. २७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक आहे. मात्र आमच्या पक्षाचा पुण्यामध्ये कार्यक्रम असल्याने या बैठकीला जाऊ शकत नसल्याचे सोमवारी परभणी शहरातील सावली विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर परभणी येथे आयोजित ओबीसीच्या एल्गार मेळाव्यासाठी आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंजि.सुरेश फड, डॉ. धर्मराज चव्हाण, सुरेश शेळके, प्रा. प्रवीण कनकुटे, रणजीत मकरंद हे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वास्तववादी आहे. ४० एकर जमीन असलेला मराठा आज दोन आणि तीन एकर जमिनीवर आलेला आहे. दुसरीकडे सरकार कृषी मालाला आधारभूत किंमतही देत नाही. त्यामुळे मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. मात्र मराठा समाज आणि ओबीसीं या दोन्ही समाजाला आरक्षणाचे वेगवेगळे ताट असलं पाहिजे, असे म्हणाले.

जरांगे यांनी जालना लोकसभा अपक्ष म्हणून लढवावीमनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये न जाता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षाचा तिकीट घेऊ नये कारण त्या पक्षाची मर्यादा असते, त्यांची ध्येयधोरणे असतात. जरांगे पाटील यांना आपल्या आंदोलनात यश मिळवायचे असेल तसेच आंदोलन कायम ठेवायचे असेल तर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरले पाहिजे. अन्यथा निवडणुकीनंतर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होऊ शकते असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आरक्षणाचा फॉर्म्यूला आमच्याकडेवंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात सत्ता द्या आम्ही हा आरक्षणाचा प्रश्न सोडवू. आम्ही जो आरक्षणाचा फॉर्म्यूला तयार केला आहे. त्यामध्ये कोणत्याच घटकावर अन्याय होणार नाही. मात्र आम्ही सत्तेवर आल्यानंतरच तो फॉर्म्यूला सांगू आणि त्याची अंमलबजावणी करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरparabhaniपरभणीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabhaलोकसभा