शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन; मुस्लीम बांधवांकडे ४० वर्षांपासून गणेश मंडळाची धुरा

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 5, 2022 17:10 IST

खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली.

परभणी : मानवत शहरात गणेशोत्सवातून सर्वधर्म समभाव तथा समाजातील एकोपा जपण्याचा उद्देशाने ड्रायव्हर गणेश मंडळ स्थापनेपासूनच सामाजिक सलोखा जपत आहे. मंडळाच्या स्थापनेपासून सर्व जाती धर्मांतील लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. या मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा मुस्लीम बांधवांवर देऊन खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असा गणेशोत्सव ड्रायव्हर गणेश मंडळ ४० वर्षांपासून साजरा करत आहे.

शहरातील खासगी वाहन चालकांनी १९८३ साली एकत्र येऊन ड्रायव्हर युनियनच्या माध्यमातून गणेश मंडळांची स्थापना केली. हातावर पोट भरणाऱ्या व जेमतेम शिक्षण असणाऱ्या या वाहनचालकांनी सामाजिक एकोपा जपण्याचा वसा घेतला. दरवर्षी गणेश उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात येते. यात दोनशे सदस्य असून सर्व एकमताने निर्णयाला पाठिंबा देतात. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासून दरवर्षी ड्रायव्हर गणेश मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लीम समाजातील सदस्यांना दिला जातो. तर उपाध्यक्ष पदाचा मान बौद्ध बांधवाला दिला जातो. सदस्य मोईन अन्सारी व सुधीर भदर्गे यांच्यापासून सुरू झालेला अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा वारसा आजही अविरत सुरूच आहे. 

दरवर्षी समितीतील सदस्य निवडताना विविध जाती धर्मांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी मंडळ पुढाकार घेते. मागील ४० वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे जोपासली जात आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी ड्रायव्हर गणेश मंडळ नेहमी पुढाकार घेते. मंडळाकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक बँड पथक आणले जाते. विविध देखावे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्यावर भर दिला जातो. आगामी काळातही विविध सामाजिक उपक्रम घेण्यासाठी मंडळ अग्रेसर राहणार असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

दरवर्षी आकर्षक मूर्तीड्रायव्हर गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात आकर्षक मूर्तीची स्थापना केली जाते. ग्रामीण तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पाहण्यास गर्दी करत. विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी चारठाणा येथील प्रसिद्ध बँड पथकाला पाचारण करीत उत्सवात रंग भरण्याचा प्रयत्न केला जातो.

धार्मिक देखावे आणि झाकी१९८३ ते २०००च्या काळात मनोरंजनाची साधने कमी असल्याने धार्मिक व सामाजिक प्रबोधनासाठी मंडळाकडून विविध झाकी आणि देखावे सादर केले जात असत. गणेश भक्त आणि नागरिक देखावे आणि झाकी पाहण्यासाठी गर्दी करतात.

विविध पुरस्काराने मंडळ सन्मानितगणेश मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी या उपक्रमाची दखल जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, खासगी सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने मंडळाला पारितोषिके देऊन गौरविण्यात आलेले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने १९९०ते १९९५ या काळात प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवparabhaniपरभणी