शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Video: मुलगा पेट्रोलसाठी रांगेत, वडील शेजारी; तरीही चोरट्याने डिक्कीतील १ लाख पळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 20:03 IST

बँकेपासून पाठलाग करत चोरट्यांनी पेट्रोल पंप गाठला; गर्दीचा फायदा घेत डिक्कीतून अलगद रक्कम पळवली

मानवत (परभणी) : पेट्रोलसाठी रांगेत असताना दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाखांची रोकड चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पळवल्याची घटना सोमवारी ( दि. ३० ) दुपारी घडली. विशेष म्हणजे, मुलगा दुचाकीवर असताना वडील बाजूलाच उभे होते. मात्र, चोरट्याने धाडस करत डिक्कीतील रक्कम अलगद लंपास केली.

मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील भास्कर लक्ष्मणराव कदम व त्यांचा मुलगा गजानन हे दोघे सोमवारी दुपारी आठवडे बाजार परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कामानिमित्त आले होते. बँकेतून १ लाख रुपये काढल्यानंतर दोघेही परत निघाले. यावेळी त्यांनी रोख रक्कम एका पिशवीत ठेवत दुचाकीच्या ( एम एच 22 ए सी 6019) डिक्कीत ठेवली. 

दरम्यान, दुपारी 12:45 वाजता शहरातील कत्रुवार पेट्रोल पंपावर गजानन पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा राहिला. तर वडील भास्करराव गाडीवरून उतरून बाजूला उभे राहिले. याच वेळी पाठलाग करत असलेला एक तरुण गजाननच्या गाडीमागे येऊन थांबला. काहीवेळ नजर ठेवत त्याने डिक्कीचे दोन्ही हुक शिताफीने उघडले. त्यानंतर गर्दी वाढत गेल्याचा फायदा घेत त्याने डिक्कीतून १ लाख रुपये अलगद लंपास केले. 

सीसीटीव्हीत घटना कैद ही चोरीची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका दुचाकीवरील दोघे कदम पितापुत्राच्या मागे पेट्रोल पंपावर आले. त्यानतंर एकाने रस्त्यावर गाडी लावली. तर दुसरा चोरीसाठी मध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. दरम्यान, याप्रकरणी आज भास्कर कदम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नारायण सोळंके हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी