शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Video : आरपीएफ जवान ठरला देवदूत, महिलेचे वाचविले प्राण

By राजन मगरुळकर | Updated: October 1, 2023 14:40 IST

परभणी रेल्वे स्थानकावरील प्रकार

परभणी : नगरसोल येथून काचीगुडाला जाणारी एक्सप्रेस परभणी स्थानकातून रवाना होत असताना चालत्या रेल्वेमध्ये डब्यात चढताना अचानक महिलेचा हात निसटला. अन रेल्वे सुरू असताना महिला प्लॅटफॉर्म व रेल्वेच्या लगत कोसळल्या. हा प्रकार स्थानकात गस्तीवर उभ्या असलेल्या आरपीएफ जवानाला दिसला. त्यांनी व अन्य एका प्रवासाने तत्काळ महिलेला बाजूला काढले. आरपीएफ जवानाच्या या प्रयत्नामुळे पुढील अनर्थ टळला आहे. हा सर्व प्रकार शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडला आहे.रेल्वे क्रमांक (१७६६२) नगरसोल येथून काचीगुडाला जाणारी रेल्वे नेहमीप्रमाणे परभणी स्थानकावर शनिवारी दुपारी आली. यानंतर काही वेळ नियोजित थांब्याप्रमाणे रेल्वे थांबली. त्यानंतर नांदेडकडे जाण्यासाठी रेल्वे निघाली असता रेल्वेने गती घेतली असताना एक महिला अन्य एका प्रवासी सोबत या रेल्वेमध्ये नांदेडला जाण्यासाठी डब्ब्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होती. अचानक रेल्वेने वेग घेतला होता. यादरम्यान नांदेडला जाण्यासाठी निघालेल्या महिलेने एका डब्याचा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोल गेल्याने सदरील महिला खाली कोसळल्या. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर परिसरातच गस्तीवर असलेले आरपीएफ परभणीचे जवान उगेंद्र मीना यांनी हा प्रकार पाहताच धाव घेऊन सदरील महिलेला तेथून बाहेर काढले. यामुळे पुढील अनर्थ टळला. 

मीना यांचा केला सत्कार यापूर्वी सुद्धा अशा घटनांमध्ये आरपीएफ जवानांनी चांगली सेवा बजावली आहे. दरम्यान, काही वेळ रेल्वे घटनेमुळे थांबली होती. त्यानंतर पुन्हा सदरील महिलेला सुखरूपपणे रेल्वे डब्यात बसवून देण्यात आले व रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली. उगेंद्र मीना यांनी केलेल्या कार्याचा आरपीएफ पोलीस निरीक्षक एस.बी.कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.

टॅग्स :railwayरेल्वे