शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात वाढली विविध फळांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:06 IST

येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील बाजारपेठेत महिनाभरापासून फळांची आवक वाढली आहे़ द्राक्षे, सफरचंदपासून ते टरबुजांपर्यंत सर्व प्रकारची फळे उपलब्ध झाली असून, आवक वाढल्याने भाव मात्र गडगडले आहेत़जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे रबी हंगाम तोट्यात गेला असला तरी स्थानिक शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या आहेत़ टरबूज, खरबूज आणि अंजीर ही फळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करीत परभणीच्याबाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीला आली आहेत़ उन्हापासून बचाव करण्यासाठी फळांचे सेवन केले जाते़ त्यामुळे या फळांना मागणीही वाढली आहे़ सद्यस्थितीला परभणी बाजारपेठेत दररोज साडेतीन क्विंटल द्राक्ष्यांची आवक होत आहे़ बार्शी, नागस या भागातून माणिक चमन, सुपर सोना, कॅप्सूल या वाणांचे द्राक्ष बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत़ तर जिल्ह्यात उत्पादित झालेले खरबूज सध्या स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे़दररोज ५ ते १० क्विंटल टरबुजांची विक्री होते़ खरबुजांमध्ये केसर आणि चक्री असे दोन प्रकार ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत़ तालुक्यातील सिंगणापूर, पूर्णा तालुक्यात अंजीराचे उत्पादन अधिक असून, हे अंजीर बाजारपेठेत उपलब्ध आहेत़ साधारणत: दोन क्विंटल अंजीरची दररोज विक्री होते़ त्याच प्रमाणे टरबुजांनाही मागणी आहे़ किरण, शुगरकिंग या वाणाच्या टरबूजांना ग्राहकांची मागणी आहे़फळांचे भाव प्रतिकिलोद्राक्ष ७० रुपयेखरबूज २० रुपयेअंजीर ६० रुपयेडाळींब ६० रुपयेसफरचंद १४० रुपयेटरबूज १५ रुपयेआंबा (दशहरी) १०० रुपयेआंबा (बादाम) ८० रुपयेमोसंबी, डाळिंबाची आवक घटली४काही फळांचा बहार संपत आल्याने आवक घटली आहे़ त्यामध्ये मोसंबी, डाळींब आणि सफरचंद या फळांचा समावेश आहे़ ही फळे पर जिल्ह्यातून येथील बाजारपेठेत विक्रीसाठी येतात़ मात्र आवक घटल्याने या फळांचे भाव वधारले आहेत़आंबे बाजारपेठेत दाखल४उन्हाळ्यात आंब्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते़ परभणीकरांची आंब्याची प्रतीक्षा संपली आहे. गावरान आंबे अजूनही बाजारपेठेत दाखल झाले नसले तरी दशहरी आणि बादाम या जातीचे आंबे सध्या बाजारपेठेत मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत़मागील काही महिन्यांपासून फळांची आवक वाढली आहे़ विविध प्रकारचे फळे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, ग्राहकांचीही या फळांना मागणी चांगली आहे़-शेख यासीन शेख सुभान, विक्रेता

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारfruitsफळे