जिल्ह्यात उपकेंद्रांच्या ठिकाणी लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या अंतर्गत मंगळवारी टाकळी कुंभकर्ण येथे लसीकरण शिबिर घेण्यात आले. तर बुधवारी बाभळगाव येथील आरोग्य उपकेंद्रात हे शिबिर पार पडले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांनी कोविड लसीकरणाला न घाबरता आणि अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन टाकसाळे यांनी केले.
यावेळी गटविकास अधिकारी अनुप पाटील, माता संगोपन अधिकारी रावजी सोनवणे, विस्तार अधिकारी मधुकर पुर्णेकर, यु.टी. राठोड, जी.एस. गोरे, आरोग्य सहायक वाघमारे, सरपंच गणेश दळवे, नितीन पवार, किल्लेदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जुनेद यांच्यासह शिक्षक, आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडीताईंची उपस्थिती होती. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांनाही कोरोना लस दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.