शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत प्लास्टिक कोटेड रस्त्याचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:01 IST

काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: काळ्या मातीमुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांवर पर्याय म्हणून तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा ६.४ कि.मी.अंतराचा रस्ता जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरुन तयार केला जात आहे. अशा पद्धतीने प्लास्टिक कोटेड रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे.साडेगाव ते मांगणगाव या भागातील जमीन काळ्या मातीची आहे. परिसरातून कालवा गेला असल्याने डांबरी रस्ता तयार केल्यानंतर पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करुनही गावांसाठी चांगला रस्ता उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होत होती. यावर पर्याय काढण्यासाठी प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागामध्ये प्रथमच हे तंत्रज्ञान वापरुन रस्त्याची निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान ग्राम सडक विभागातील रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या शाखेच्या वतीने हा रस्ता तयार केला जात आहे. मंगळवारी आ. राहुल पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली. मांगणगाव ते साडेगाव या ६.४ अंतरासाठी ४.९८ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. प्लास्टिक कोटेडचे नवीन तंत्रज्ञान वापरुन रस्ता बनविल्यानंतर तो खचणार नाही आणि अधिक काळापर्यंत रस्त्याचे आयुष्यमान वाढेल, अशी आशा व्यक्त होत आहे.या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साडेगाव ते परभणी हे ३० कि.मी.चे अंतर असून नागरिकांना परभणी येथे वळसा घालून यावे लागत असे. साडेगाव ते मांगणगाव रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याने हे अंतर १७ कि.मी.पर्यंत कमी होणार आहे.असा होणार रस्ता४साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने तयार केला जात आहे. सुरुवातीला मुरुमाचा थर टाकला जात असून त्यावर जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरले जात आहे. या मटेरियलवर पुन्हा मुरुमाचा थर नंतर गिट्टीचे दोन थर आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. ४५ से.मी.पर्यंत जाडीचा हा रस्ता होणार असल्याची माहिती अभियंता सचिन पडुळे यांनी दिली.४कचºयातून निघणाºया प्लास्टिकचा वापर तांत्रिक प्रक्रिया करून या कामासाठी वापर केला जातो. प्लास्टिक कचºयापासून बनलेल्या रस्त्यात पाणी कमी प्रमाणात झिरपते. या विभागाचे तज्ज्ञ सतीश शुक्ला यांच्या मतानुसार, तांत्रिक प्रक्रिया केलेला प्लास्टिकचा कचरा हा उत्कृष्ट राहिलेला आहे. या तंत्रज्ञानात प्लास्टिकबरोबर गिट्टीचा चुरा मिसळला जातो. ज्यामुळे रस्त्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होतो. ज्यामुळे पाणी रस्त्यावर थांबू देत नाही. पाणी मुरत नसल्यामुळे या रस्त्याचे आयुर्मानही वाढते.

टॅग्स :parabhaniपरभणी