अस्ताव्यस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा
परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयासमोर नागरिक अस्ताव्यस्त वाहने उभी करत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेतून मुख्य रस्त्याकडे येत असताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
सोनपेठ : तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमधील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवू शकते. आतापासून या हातपंपाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे.
रस्त्यावरील पुलांचे काम रखडले
गंगाखेड : गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील ठिकठिकाणच्या पुलांचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे.
नागरिकांना मास्क वापराचा विसर
परभणी : येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामांनिमित्त नागरिक नियमितपणे येतात. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. अशा नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.