शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा परिषदेतील प्रकार : नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परभणीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:37 IST

नंदुरबार, नाशिक, धुळे आदी ठिकाणी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ वाजता परभणीतील जिल्हा परिषदेच्या परिसरातून बांधकाम विभागातील उपअभियंता एम.बी. भोई यांना अचानक उचलले. त्यामुळे उपस्थित कर्मचाºयांना काही वेळ कळालेच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नंदुरबार, नाशिक, धुळे आदी ठिकाणी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १२ वाजता परभणीतील जिल्हा परिषदेच्या परिसरातून बांधकाम विभागातील उपअभियंता एम.बी. भोई यांना अचानक उचलले. त्यामुळे उपस्थित कर्मचाºयांना काही वेळ कळालेच नाही.मूळचे नंदुरबार येथील रहिवासी असलेले उपअभियंता मोहनलाल बन्सीलाल भोई यांची परभणी जिल्हा परिषदेत आॅक्टोबर अखेरीस नियुक्ती बदली झाली होती. त्यांच्याकडे गंगाखेड उपविभागाचा पदभार देण्यात आला आहे. बुधवारी जिल्हा नियोजन समितीची परभणीत बैठक असल्याने जिल्हाभरातील विविध विभागांचे अधिकारी शहरात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर उपअभियंता मोहनलाल भोई हे देखील परभणीत आले होते. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरु असताना उपअभियंता भोई हे जिल्हा परिषदेतच होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभे असताना अचानक साध्या वेषातील ५ ते ६ जणांच्या पोलीस पथकाने त्यांना पकडले. उपस्थितांना भोई यांना अचानक का पकडले, हे समजलेच नाही. ज्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाºयाने आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नंदुरबार येथील कर्मचारी असल्याचे सांगितले, त्यानंतर कुठे भोई यांच्या अचानक पकडण्यामागचे कारण उपस्थितांना कळाले. त्यानंतर या पथकाने याबाबतची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांना देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सवडे हे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर हे कार्यालयीन कामानिमित्त नांदेडला गेले असल्याने तेही जि.प.त उपस्थित नव्हते. शिवाय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गोवंदे हे ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत असल्याने त्यांचाही या पथकाशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या पथकातील अधिकाºयांनी याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्याकडे दिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाºयांनी उपअभियंता भोई यांना जीपमध्ये बसवून नंदुरबारकडे नेले. या सर्व प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषदेत पदाधिकाºयांची उपस्थिती कमी असली तरी बघ्यांची मात्र चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले.भोई यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखलबांधकाम विभागातील उपअभियंता मोहनलाल बन्सीलाल भोई यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबाबतची नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली. चौकशीअंती भोई यांनी धुळे, शाहदा, नंदुरबार व नाशिक येथे नोकरी करीत असताना बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे निदर्शनास आले. त्यांना त्यांची पत्नी चंद्रकला मोहनलाल भोई यांनी सहाय्य केल्याप्रकरणी त्यांच्यावरही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच अनुषंगाने नंदुरबारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी परभणीत कारवाई केली. परभणीतील अन्य काही अधिकाºयांची नावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असल्याची चर्चा यानिमित्ताने ऐकावयास मिळाली.