शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्या चुलत भावांवर काळाचा घाला; आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 2, 2023 18:26 IST

पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा; एकाचा पाण्यात बुडून, दुसऱ्याचा अपघाती मृत्यू

पालम (जि. परभणी) : आधीच एकाचे मातृछत्र, तर दुसऱ्याचे पितृछत्र हरवलेल्या दोन सख्या चुलत भावांवर काळ कोपला. दोन दिवसांच्या अंतराने या दोन भावांचा मृत्यू झाला असून, सदर घटनेमुळे पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा पसरली आहे. पहिली घटना ३० एप्रिलला, तर दुसरी घटना १ मे ला घडली. त्यात एकाचा पाण्यात बुडून, तर दुसऱ्याचा अपघाताने मृत्यू झाला.

आरखेड येथील राजकुमार तुकाराम दुधाटे (३०) यांचा पहिल्या घटनेत मृत्यू झाला. ते २८ एप्रिलला सकाळी पोहण्यासाठी गावालगत गोदावरी नदीत गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. दरम्यान, दोन दिवस ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. तरीही ते सापडले नव्हते. त्यानंतर ३० एप्रिलला गोळेगाव शिवारातील गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे (२७) उपस्थित होते. त्यालाही दोन दिवसानंतर काळाने गाठले. त्यांचा अपघात नांदेडवरून पालमकडे येत असताना सोमवारी (ता. १) रात्री ९:०० वाजता झाला. दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीने ते पालमकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीला पालमकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ऑटोची धडक बसली. त्यात नितीन दुधाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ते नांदेड जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीस होते. एकाच घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्याने दुधाटे कुटुंबीयांवर काळ रुसला.

आरखेड गावात पेटल्या नाहीत चुलीराजकुमार दुधाटे यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, तीन मुली आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यातील एका मुलीचे वय दीड वर्षदेखील नाही. दुसरीकडे नितीन दुधाटे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. घरात एकही कर्ता पुरूष नाही. शिवाय, नितीन दुधाटे यांच्या विवाहाला दोन वर्षेही झाली नाहीत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २) दुपारी १२:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे आरखेड गावात चुलीच पेटल्या नव्हत्या.

 

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात