शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

धर्मापुरी (परभणी) येथे दोन दिवसीय अन्य मराठी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:07 IST

घाटगे पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने ६ व ७ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्यिक राजेंद्र गहाळ यांची निवड झाली असून स्वागताध्यक्षपदी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांची निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :घाटगे पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने ६ व ७ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्यिक राजेंद्र गहाळ यांची निवड झाली असून स्वागताध्यक्षपदी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांची निवड झाली आहे.धर्मापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत होणाºया या साहित्य संमेलनाच्या स्थळाला संत चोखामेळा नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. संत नामदेव महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सय्यद जब्बार पटेल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. सरपंच शारदाताई कदम, मंगलताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता उद्घाटनीय सत्र असून या कार्यक्रमास उद्घाटक सय्यद जब्बार पटेल, संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, आ.डॉ.राहुल पाटील, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष रेणू पाचपोर, अशोक कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.विविध विषयांवर परिसंवादया संमेलनात बळीराजा तू जगायलाच हव, या विषयावर होणाºया परिसंवादात प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव, मीराताई कदम सहभागी होणार आहेत. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिक्षण व ग्रामीण महिला विकास या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा.यु.एच. बलखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या परिसंवादात अशोक अर्धापूरकर, राजकुमार कºहाळे, प्रा.गणेश मारेवाड सहभागी होणार आहेत.दुपारी १२ ते १ या वेळेत कथा-कथन होणार असून प्रा.अशोक शिंदे, संतोष पवार सहभागी होतील. दुपारी २ ते ४ या वेळेत कविसंमेलन होईल. शफी बोल्डेकर, शिवाजी गिरी, साहेब शिंदे, महासेन प्रधान, निवृत्ती पवार, शिलवंत वाढवे, बबन मोरे यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता समारोपीय सत्र होईल.प्रा.यु.एच.बलखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सत्रात हिंगोली जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, डॉ. दत्तात्रय मगर, औंढा पं.स.चे सभापती बी.आर. भगत, जि.प. सदस्य अजीत मगर, प्राचार्या वंदना शिंदे, हिंगोलीतील सहाय्यक प्रकल्प संचालक जयराम मोडके, राजकुमार वाडीकर, डॉ.संतोष पवार, संजय निकम, ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव शीतल सोनटक्के यांची उपस्थिती राहील.