शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रिक्षात वृद्धास लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात; आरोपी नांदेडचे 

By राजन मगरुळकर | Updated: May 3, 2023 16:14 IST

पोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परभणी : नवा मोंढा ठाण्याच्या हद्दीत ऑटोरिक्षामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील ३४ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतलेल्या प्रकरणात ऑटोचालक व अन्य दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. परभणी पोलिसांच्या पथकाने या प्रकरणात दोन चोरट्यांना नांदेड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ऑटो व चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धर्मापुरी येथील रामेश्वर जिजाजी चट्टे यांनी २६ एप्रिलला झालेल्या या घटनेची नोंद नवा मोंढा ठाण्यात केली होती. या घटनेमध्ये पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांनी सोमवारी गुन्ह्याच्या तपासासाठी चार पथक स्थापन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पथक व सायबर विभागाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे परभणी शहर, झिरो फाटा, पूर्णा येथे शोध घेतला. मिळालेल्या माहितीवरून सदरील गुन्हा हा नांदेड येथील गौस बेग रफिक बेग, शेख वसीम शेख सत्तार व इतर दोन जणांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी गौस बेग रफिक बेग (२२, ऑटोचालक, रा.मस्जिद जवळ, निजाम कॉलनी, श्रीनगर, नांदेड) व त्याचा मित्र शेख वसीम शेख सत्तार (२७, रा.नई आबादी, नांदेड) या दोघांना मंगळवारी नांदेड येथून ताब्यात घेतले. त्यांनी सदरचा गुन्हा अन्य दोन मित्रांसोबत केल्याचे सांगितले.

५७ हजारांचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण ५७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, मारोती चव्हाण, नागनाथ तुकडे, व्यंकट कुसुमे, बाळासाहेब तूपसमुद्रे, हरिश्चंद्र खूपसे, दिलावर खान सायबरचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी केली.

ऑटोत बसताच लुटले धर्मापुरी येथील रामेश्वर जिजाजी चट्टे यांनी फिर्याद दिली. रामेश्वर चट्टे हे परभणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २६ एप्रिलला सकाळी आले होते. मुलीचे लग्न असल्याने त्यांनी तीस हजार रुपये घरून परभणीत आणले होते. त्यांनी बँकेतून चार हजार सातशे रुपये काढले. यानंतर शिवाजी महाराज पुतळा येथून बसस्थानक जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी ऑटो पकडला. या ऑटोमध्ये मागील बाजूस बसलेल्या दोन अनोळखी प्रवाशांनी त्यांच्या खिशातील ३४ हजार ७०० रुपये बळजबरीने काढून घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी