परभणी शहरातील त्रिमूर्तीनगर भागात घंटागाडी चालकाचा वागणुकीमुळे नागरिक वैतागले असून या पण घंटागाडी चालकाची तक्रार मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे
मागील १५ ते २० दिवसांपासून पश्चिम त्रिमूर्तीनगर येथे घंटागाडी चार ते पाच दिवसाआड अवेळी येत आहे. दुपारी दीड- दोन वाजता प्रभाग दोनची गाडी येऊन फक्त पेट्रोलिंग करून जाते. याबाबत एजन्सी सुपरवायझरची चौकशी केली असता सध्या आमच्याकडील गाड्या खराब झाल्या आहेत. दुरुस्तीसाठी आहेत, अशी उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. २३ मे रोजी दुपारी ३.२० वाजता एम. एच. २२/ एएन १८५८ या क्रमांकाची घंटागाडी त्रिमूर्तीनगर येथे आली असता ज्येष्ठ नागरिक व महिला कचरा घेऊन उभे असताना घंटागाडी चालक गाडी कुठेही थांबवत नव्हता. घंटागाडी चालकाने नागरिकांशी असभ्य भाषेत वर्तन केल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तेव्हा या घंटागाडी चालक व त्याच्या मदतनीसावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर डी.आर. देशमुख, बाळासाहेब टोम्पे, रामेश्वर चव्हाण, फिसफिसे, गणेश मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.