शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

युट्यूबवर पाहून गॅसकटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न सायरन वाजल्याने अपयशी, पाच जण ताब्यात

By राजन मगरुळकर | Updated: July 17, 2023 18:06 IST

स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला गुन्हा

परभणी : एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांनी रेकी पद्धतीचा अवलंब केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. यातील पाच आरोपींना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, एटीएम फोडण्यापूर्वी त्यांनी यासाठी लागणारे साहित्य एमआयडीसी भागातील अन्य एका ठिकाणाहून चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.

एटीएम चोरी प्रकरण व गॅस कटर चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील टोळीचा छडा पोलीस दलाने घटनेनंतर ४८ तासातच लावला. पुढील तपास करण्याच्या अनुषंगाने पाच दिवस गोपनीयता बाळगण्यात आली. एटीएम मधील चोरी प्रकरण मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने याचा तपास केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीमधील संशयितांची माहिती गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत घेण्यात आली. त्यामध्ये सदरील गुन्हा हा आरोपी लक्ष्मण पांडुरंग ढोबळे (रा.अहिल्याबाई होळकर नगर, वसमत रोड) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे समजले. त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता अन्य चार जण ज्यामध्ये अनिल गौतम वाळवंटे (रा.महात्मा फुले नगर), विनोद भगवान राठोड (रा.राधा नगर), हर्षद इंगळे, आकाश इंगळे (दोघे रा. नांदापूर) यांच्यासोबत सदरील चोरीचा प्रयत्न युट्युब वरील व्हिडिओ पाहून केल्याचे व अन्य चोरीचा प्रकारही केल्याची कबुली आरोपीने दिली. या गुन्ह्यात वापरलेली एक स्कुटी जप्त करण्यात आली. सदर पाच आरोपींना नवा मोंढा ठाण्यात तपास कामी हजर केले आहे.

आधी एमआयडीसीत केली चोरीसदरील चोरट्यांनी एमआयडीसीच्या प्लॉट नंबर सी-२३ येथून गॅसकटर , ऑक्सिजन, एक सिलेंडर असे साहित्य चोरून आणले आणि त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम चोरीचा प्रयत्न केला. परंतू, प्रयत्न करूनही एटीएम तोडून पैसे चोरणे शक्य झाले नाही. यानंतर बराच कालावधी लोटल्यावर एटीएममध्ये सायरन वाजल्याने आरोपींनी भीतीपोटी तेथून पळ काढला.

असा केला प्रयत्नसोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया एमआयडीसी परिसरच्या एटीएम येथे निर्जन वस्तीतील बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर बँक हेरून त्यामधील असणाऱ्या एटीएमची व बँकेची रेकी संबंधितांनी केली. रेकीप्रमाणे आरोपींनी बँकेच्या इमारतीवर असणाऱ्या कॅमेऱ्याची दिशा बदलून ते स्वतः कॅमेऱ्यात दिसणार नाहीत, याची खबरदारी घेतली. त्यानंतर एक जण मुख्य रस्त्यावर, एक जण बँकेच्या पाठीमागील रस्त्यावर, एक जण बँकेच्या मुख्य गेटमध्ये निगराणीस ठेवण्यात आले व दोन मुख्य आरोपींनी चेहऱ्याला मास्क बांधून हातात एटीएम तोडण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर एटीएम हत्याराने तुटत नसल्याने आरोपींनी पुन्हा एकत्र जमून मशीन तोडण्यासाठी एमआयडीसी भागातून सर्व साहित्याची चोरी केली आणि पुन्हा प्रयत्न केला.

यांनी उलगडला गुन्हापोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सुभाष अनमूलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कवाळे, राजेंद्र मुंडे, रामकिशन नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पूयड, नागनाथ तुकडे, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, विलास सातपुते, आशा सावंत, दिलावर खान, हरी खूपसे, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, निकाळजे, घुगे, केंद्रे, अर्जुन टाक, मुंडे, चव्हाण, अनिल कटारे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी कारवाई केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीatmएटीएम