शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:47 IST

राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासन एकीकडे आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील आदिवासी समाज मात्र बेदखल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हाभरात तब्बल ९६ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या या समाजाच्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद करण्यात येत असल्याने या समाजासाठींच्या बहुतांश योजना जिल्ह्यात राबविल्याच गेल्या नाहीत.आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यभरात आदिवासी समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जातात. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातही जवळपास ९६ हजार ५०० आदिवासींची लोकसंख्या आहे. जिल्ह्यातील ३५ गावे हे १०० टक्के आदिवासींची आहेत. जिंतूर, पालम, पाथरी या भागात आदिवासींची अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे या आदिवासी समाज बांधवांकरीता राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे निधी उपलब्ध करुन देणे आवश्यक असताना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे या संदर्भातील निधींची तरतूद म्हणावी त्या प्रमाणे उपलब्ध होऊ शकली नाही. परभणीपासून वेगळा झालेल्या हिंगोली जिल्ह्यात आदिवासींची १ लाख ११ हजार लोकसंख्या आहे. परंतु, तेथील जागरुक लोकप्रतिनिधींनी आदिवासींच्या योजनांसाठी आवश्यक असलेले सिलींग लिमिट मुंबईत वजन खर्ची करुन वाढवून घेतले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्याला आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेअंतर्गत तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. त्याच तुुलनेत परभणी जिल्ह्यात आदिवासींची ९६ हजार ५०० लोकसंख्या असताना फक्त २ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या त्रोटक निधीतून विकासकामांसाठी पैसेच राहत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत आदिवासी वस्ती विकासासाठी निधीही मिळत नाही. ही बाब शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेत समोर आली. या बैठकीत सिलींग लिमिट वाढवून घेण्याचा ठराव घेण्याविषयी सूचना आली. त्यानुसार ठरावही घेण्यात आला. या विषयीच्या चर्चेत यापूर्वीच ठराव वाढवून घेतला असता तर जवळपास २० कोटी रुपयांचा निधी आदिवासी समाज बांधवांच्या विकासकामांसाठी उपलब्ध झाला असता, अशी बाब निदर्शनास आली. त्यामुळे आता घेतलेल्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी कशी होईल, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्ह्यतील इतर लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.