वाळूचा अवैध उपसा जिल्ह्यात सुरूच
परभणी : जिल्ह्यात दररोज वाळूचा अवैध मार्गाने उपसा होत आहे. पूर्णा, गंगाखेड, पाथरी तालुक्यात रात्रीच्यावेळी अवैध वाळू उपसा करून ही वाळू चढ्यादराने विक्री केली जात आहे. या वाळू उपशाला लगाम लावण्यासाठी प्रशासनाकडून मात्र प्रयत्न केले जात नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे महसूल प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त असल्याचा फायदा उचलत वाळू चोर मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करीत आहेत.
कोरोना चाचण्यांना रेल्वेस्थानकावर फाटा
परभणी : जिल्ह्यात प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असली, तरी रेल्वे वाहतूक सुरूच आहे. अनेक प्रवासी दररोज रेल्वेने परभणी शहरात दाखल होतात. परंतु, या प्रवाशांची कोरेाना चाचणी केली जात नाही. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. चाचणी न करताच प्रवासी दाखल होत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.