शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी कृषी विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:36 IST

महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (कृषी उपसंचालक) संवर्गातील सहा अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, आता या अधिकाºयांच्या जागी नवीन अधिकाºयांची प्रतीक्षा लागली आहे़महाराष्ट्र कृषी सेवा गट अ संवर्गातील राज्यामधील ९५ अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश कृषी पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव एस़एस़ धपाटे यांनी ८ जून रोजी काढले आहेत़ या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील कृषी उपसंचालक रक्षा शिंदे यांची बदली लातूर येथे विभागीय सांख्यिकी कार्यालयात झाली आहे़ तसेच जिल्हा बीज प्रक्रिया अधिकारी सागर खटकाळे यांची बदली परभणी येथेच उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून झाली आहे़ विभागीय बीज प्रक्रिया अधिकारी शेख मुजाहेद शेख जमीरोद्दीन यांची बदली बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़ कृषी विकास अधिकारी बळीराम कच्छवे यांची बदली हिंगोली येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे़ उपविभागीय कृषी अधिकारी आऱटी़ सुखदेव यांची बदली नांदेड येथे करण्यात आली आहे़ आत्माचे प्रकल्प उपसंचालक संतोष नादरे यांची बदली नांदेड येथे कृषी विकास अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़तर हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावर यांची बदली परभणी येथे जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी म्हणून करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपविभागीय कृषी अधिकारी विजयकुमार पाटील यांची बदली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कृषी उपसंचालक या पदावर करण्यात आली आहे़ लातूर येथील उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांची बदली परभणी येथे कृषी विकास अधिकारी या पदावर करण्यात आली आहे़ जिल्ह्यातील सहा अधिकाºयांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांच्या जागी केवळ तीन अधिकाºयांना बदलीने नियुक्ती दिली आहे़ त्यामुळे उर्वरित तीन पदे रिक्त राहत असून, या जागी कोणत्या अधिकाºयांची नियुक्ती होते? याकडे लक्ष लागले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTransferबदलीAgriculture Sectorशेती क्षेत्र