तालुक्यातील जवळा पा. व पेंडू बुद्रूक ग्रामपंचायतीला ग्रामसेविका जे.आर. फड कार्यरत होत्या. त्यातील पेंडू ग्रामपंचायत कमी करून त्यांची गुळखुंडला बदली करण्यात आली. तालुक्यातील चाटोरी आणि बोरगाव बुद्रूकचे ग्रामसेवक के.बी. देसाई यांच्याकडील बोरगावची जबाबदारी कमी करण्यात आली. आता बोरगावसह पेंडू गावाला व्ही.डी. खुडे यांची बदली केली आहे. दुसरीकडे ग्रामसेवक एन.बी. कंटेकर यांची पिंपळगाव मुरूडदेव ग्रामपंचायत कमी करून त्यांना सिरपूरची जबाबदारी देण्यात आली. परंतु सिरपूरहून ग्रामसेवक अजित तांदळे यांची बदली करीत त्यांना पिंपळगाव मुरूडदेव येथे रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामसेवक एस.डी. भालेराव यांच्याकडील चोरवड गाव कमी करण्यात आले. ते ग्रामसेवक डी.एल. अवचार यांना देत त्यांच्याकडे खडी, मोजमाबाद गावची जबाबदारी आहे.
पालम तालुक्यातील ग्रामसेवकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST