रेल्वेला वाढली गर्दी
परभणी : जिल्ह्यातील बस वाहतूक बंद असल्याने रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुणे, मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी जिल्ह्यात दाखल होत आहेत. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
लघु विक्रेते अडचणीत
परभणी : जिल्ह्यातील लघु विक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले आहेत. मागील महिनाभरापासून आठवडी बाजार बंद आहे. परिणामी या व्यवसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.
खासगी वाहतूक ठप्प
परभणी : कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यांतील प्रवासी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे येथील ट्रॅव्हल्स चालक अडचणीत आले आहेत. ३० एप्रिलपर्यंत खासगी वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बँकांमध्ये वाढली गर्दी
परभणी : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नानलपेठ शाखेत मागील काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे.