शहरातील अंतर्गत वसाहतीसह आता मुख्य रस्त्यांची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. यामध्ये देशमुख गल्ली ते सुपर मार्केट, देशमुख हाॅटेल ते उघडा महादेव मंदिर, जुना पेडगाव रस्ता तसेच विद्यानगर ते जिंतूर रोड, खंडोबा बाजार ते हडको, शिवाजीनगर ते राजगोपालाचारी उद्यान, एमआयडीसी भागातील रस्ता, संत तुकाराम काॅलेज ते कारेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. यासह अन्य रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. वाहनधारक या रस्त्याने ये-जा करताना त्रास सहन करत मार्ग काढत आहेत. यातील अनेक रस्ते शहराला जोडणारे आहेत. तेथून जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी डांबर टाकून खड्डे बुजविले जातात. पुन्हा तीच परिस्थिती होते. पावसाळ्यात याच रस्त्यांची अवस्था अजून खराब होते. यामुळे महापालिकेने प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यातून मार्ग काढण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:18 IST