शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत राज्य रेल्वे फाटकमुक्त करणार, चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 07:11 IST

राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़

परभणी : राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत कार्यालय वझूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी ११ वाजता पूर्णा तालुक्यातील वझूर गावाजवळ गोदावरी नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आ़मोहन फड, अ‍ॅडग़ंगाधरराव पवार, आ़डॉ़मधुसूदन केंद्रे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, आबासाहेब पवार, बबनराव पवार, माधव दुधाटे, मुंजाभाऊ शिंदे, अ‍ॅड़अशोकराव शिंदे यांची उपस्थिती होती़पाटील म्हणाले, शेतीमाल बाजारपेठेत आणण्यासाठी रस्ते व पुलांची नितांत आवश्यकता असते़ आघाडी शासनाने याकडे दुर्लक्ष केले़ मात्र या शासनाकडून शेतकऱ्यांना मागणी करण्याआधीच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जात आहे़ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत राज्यातील १६ हजार गावे पाणीदार करण्यात आली आहेत़ त्यामुळे येत्या काळात शेतकºयांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले़

भाजप सरकार शेतक-यांच्या हिताचे- दानवेभाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर पीक विमा, आणेवारीच्या पद्धतीत बदल करून शेतकºयांना न्याय देण्याचे काम केले आहे़ त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच पीक विम्याच्या माध्यमातून राज्य शासनाने परभणी जिल्ह्यासाठी भरभरून मदत केली. शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेऊन मुबलक प्रमाणात खत साठा उपलब्ध करून दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी सांगितले़

पीक विम्यापोटी जिल्ह्याला १०६ कोटी रुपये- लोणीकरपरभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत़ येत्या आठ दिवसांत पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकºयांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येतील, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले़

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील