शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

परभणीत जुगार खेळताना सापडले तीन पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:42 IST

छाप्यात सात जणांवर गुन्हे दाखल

परभणी : शहरातील शास्त्रीनगर भागात पोलीसच जुगार खेळत असल्याची  गुप्त माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर टाकण्यात आलेल्या छाप्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह सात जण आढळले असून, त्यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई बुधवारी रात्री ८ च्या सुमारास करण्यात आली़ 

शहरातील शास्त्रीनगर भागात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, मुंजाजी हंडे, गोविंद मुरकुटे, अमोल खंदारे, वंदना चव्हाण, सुनंदा साबणे यांच्या पथकाने १३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास या भागात छापा टाकला असता ७ जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले. 

पोलिसांनी या आरोपींविरुद्ध कारवाई करीत त्यांच्याकडून ९ हजार २४० रुपये रोख आणि सहा मोबाईल असा २८ हजार ४४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रभाकर रामकिशन बीडकर यांनी तक्रार दिली आहे. त्यावरुन शेखर दुधगावकर, महमद जब्बार, संतोष ऊर्फ कान्हा सोनवणे, विजयसिंह राजपूत या चौघांसह पोलीस कर्मचारी निवृत्ती गिरी, कैलास सूर्यवंशी, रामकिशन खांडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुयड तपास करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकparabhaniपरभणी