राज्य शासनाने कोरोना संसर्ग काळात ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिवभोजन थाळीचे केंद्र वाढविण्यात आले असून, या केंद्रांचे उद्दिष्टदेखील दीडपट वाढविले आहे. त्यानुसार १५ एप्रिल ते २३ ऑगस्ट या काळात प्रतिदिन ३ लाख ४८ हजार ३२९ नागरिकांना शिवभोजन थाळीचे वितरण केले जात आहे. या योजनेअंतर्गत परभणी तालुक्यातील १२ केंद्रांवर वाढीव इष्टांकानुसार प्रतिदिन २ हजार ५८८, गंगाखेड तालुक्यात दोन केंद्रावर प्रतिदिन ३७५, पूर्णा तालुक्यातील २ केंद्रांवर प्रति दिन २६३, मानवत तालुक्यातील १ केंद्रावर ११३, सेलू तालुक्यातील १ केंद्रावर ११३, जिंतूर तालुक्यातील २ केंद्रांवर २६२, पालम तालुक्यातील एका केंद्रावर ११३, पाथरी तालुक्यातील एका ११३ आणि सोनपेठ तालुक्यातील एका केंद्रावर ११३ शिवभोजन थाळीचे प्रति दिन उद्दिष्ट आहे.
तीन महिन्यांत शिवभोजनचे साडेतीन लाख लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST