शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:31 IST

महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना परभणी शहरात मात्र जलवाहिनीच्या गळतीतून पाण्याचा अपव्यय होत आहे़ २७ फेब्रुवारी रोजी नळाला पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसरात असलेल्या जलवाहिनीच्या गळतीतून पाणी रस्त्यावर वाहत होते़ या पाण्याचा लोंढा स्टेशन रोडपर्यंत पोहचला़ तसेच जिल्हा परिषद कन्या शाळेजवळ महाराष्ट्र बँकेच्यासमोर जलवाहिनी फुटली असून, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले़या पाण्याचा लोंढा सिटीक्लबपर्यंत पोहचला होता़ रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले़ याच भागातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील नळाद्वारेही बुधवारी पाण्याचा अपव्यय झाला़ १ ते २ तासांमध्ये हजारो लिटर पाणी वाया गेले आहे़ शहरातील जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी होत असताना गळती दुरुस्तीला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे़ परिणामी पाण्याचा अपव्यय होत आहे़पत्र देऊनही होईना कारवाईशहरातील पेडा हनुमान परिसरात पाईप फुटल्याने पाणी वाया जात असल्याची माहिती २१ डिसेंबर रोजी एका नागरिकाने महापालिकेला पत्राद्वारे दिली आहे़ या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते़ तेव्हा फुटलेला पाईप दुुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली़ मात्र दोन महिने उलटूनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली नाही़ त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी