शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महादेव मंदिराची घंटा चोरताना सापडले, चौकशीत देवीची दानपेटी पळवल्याचीही दिली कबुली

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 2, 2023 17:14 IST

सेलू पोलिसांचा तपास; मंदीरातील घंटा चोरणाऱ्या आरोपींनी केला होता दुसरा गुन्हा

सेलू (जि. परभणी)  : तिडी पिंपळगाव येथील मंदिरातील काश्याची घंटा चोरून नेताना फिर्यादीसह काहींनी पाठलाग करत चोरट्यांना पकडून सेलू पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर पोलीस तपासात देवी मंदीरातील दानपेटी चोरून ती विहिरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींकडून मिळाली. शनिवारी दुपारी एकला पोलिसांनी ही दानपेटी विहीरीतून बाहेर काढली.

तिडी पिंपळगाव येथील महादेव मंदिरातील घंटा चोरून नेतांना किशोर घुंबरे व काशिनाथ घुंबरे यांनी पाठलाग करीत आरोपी सावळीराम साहेब शिंदे, किशोर भगवान राऊत (दोघे रा. फुलेनगर, पाथरी) यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन १९ नोव्हेंबर रोजी सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. किशोर घुंबरे यांचे फिर्यादीवरून या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पो.नी.समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी पंडित यांनी तपास केला. या दरम्यान आरोपींनी येथील देवी मंदिरातून ९ नोव्हेंबर रोजी रात्री दानपेटी चोरून नेल्याची कबुली दिली. दानपेटीत ६ हजार ५०० हजार रूपये देणगी रक्कम निघाली. ती दोघांत वाटून घेतली व  दानपेटी बांदरवाडा परिसरात एका विहीरीत फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.

दरम्यान, पोउपनी पंडीत,पो.ना.कोपनार,अझहर यांनी शनिवारी दुपारी १ वा. काही तरुणांच्या सहकार्याने त्या विहीरीतून दानपेटी बाहेर काढली.याशिवाय या आरोपींनी मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ व आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा उघडकीस आणला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी