शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना ‘ईडी’ची भीती; तेच पक्षातून बाहेर -सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:05 IST

कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने लढावे

ठळक मुद्देराज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाक

वसमत (जि. हिंगोली) : ईडी, सीबीआयची भीती, कारखाने, बँकांना मदतीचे आमिष दाखवून पक्षांतर घडवले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही. पक्षांतर करणाऱ्या सर्वांना मंत्रीपद देण्याचेही आमिष दिले जात असल्याने भाजपचे सरकार पुन्हा आलेच तर सर्व मंत्री आमचेच राहतील, असा टोला राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

वसमत येथे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. महाविद्यालयीन तरूणांशीही त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सर्व शक्तीनिशी लढा, असे आवाहन केले.  शरद पवार यांनी आजवर अन्य पक्षांचे नेते फोडले, पक्ष फोडले, त्यात व आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचा प्रकार यातील फरक काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी असे प्रकार शरद पवार यांनी कधी केले नाही. त्या काळात जे पक्षांतर झाले ते तत्त्वाचे राजकारण होते, असे  सांगितले. ईव्हीएमबद्दल शंका आहे, या मुद्यावर आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवा यश आपलेच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने  लढावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाकभाजप सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली असून त्याचा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केला. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात रोजगाराचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातही बेरोजगारीचा प्रश्न अधिक चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र कोणत्याच क्षेत्रात आघाडीवर नाही; परंतु, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतीत मात्र राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेparabhaniपरभणी