शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तेरा पोलीस अधिकाऱ्यांची परभणी जिल्ह्याबाहेर बदली, दहा नवीन अधिकारी जिल्ह्यात येणार

By राजन मगरुळकर | Updated: June 28, 2023 18:21 IST

नांदेड परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या

परभणी : नांदेड परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस आस्थापना मंडळातील नि:शस्त्र पोलीस निरीक्षक, नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक यांच्या परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये बदली केल्या आहेत. या बदली आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षक आणि आठ सहायक पोलीस निरीक्षक हे जिल्ह्याबाहेर बदली झाल्याने जाणार आहेत, तर अन्य तीन जिल्ह्यांतून परभणीमध्ये पाच पोलीस निरीक्षक आणि पाच सहायक पोलीस निरीक्षक बदलीने रुजू होणार आहेत.

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी मंगळवारी हे प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये नि:शस्त्र पोलीस निरीक्षक आणि नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे.

या पोलीस निरीक्षकांची बदलीपूर्णेचे सुभाषचंद्र मारकड यांची नांदेड जिल्ह्यात, गणपत राहिरे यांची हिंगोली जिल्ह्यात, सोनपेठचेे सुनील रितवाड यांची लातूर जिल्ह्यात, नरेंद्र पाडळकर यांची हिंगोली जिल्ह्यात, गंगाखेडचे वसुंधरा बोरगावकर यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आहे.

या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदलीविजय रामोड हिंगोली जिल्ह्यात, शिवाजी देवकते नांदेड जिल्ह्यात, बळवंत जमादार निलंबित असल्याने बदली नाही, रमाकांत नागरगोजे यांची लातूर जिल्ह्यात, आश्रोबा घाटे यांची नांदेड जिल्ह्यात, गंगाधर गायकवाड यांची नांदेड जिल्ह्यात, सुरेश मान्टे यांची नांदेड जिल्ह्यात, शिवकुमार मुळे यांची नांदेड जिल्ह्यात बदली झाली आहे.

हे अधिकारी जिल्ह्याला मिळणारलातूर येथील सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, नांदेड येथील मल्हारी शिवरकर, नांदेड येथील सुनील लहाने, विजयकुमार कांबळे हिंगोली येथील माधव कोरंटलू, नांदेड येथील पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, दिलीप तिडके, अवधूत कुशे, संजय ननवरे आणि लातूर येथील चितांबर कामठेवाड हे परभणीला पोलीस निरीक्षक म्हणून बदलून येणार आहेत.

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी