परभणी येथील मराठवाडा प्लॉट भागातील लक्ष्मी दिलीप मुसळे यांच्या घरातून दोन महिन्यापूर्वी दानिश मुजीब कुरेशी याने पाण्याची मोटार व गॅस सिलेंडरची टाकी चोरून नेली होती. याबाबत लक्ष्मी मुसळे यांनी दानिश कुरेशी याचे वडील मुजीब कुरेशी यांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी चोरून नेलेले साहित्य परत आणून दिले होते. ६ जूनच्या रात्री १.३० च्या सुमारास घरातून आवाज आल्याने लक्ष्मी मुसळे या जागे झाल्या असता दानिश कुरेशी हा बाथरूमजवळ दबा धरून बसल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दानिश याला कशासाठी आला आहेस, असे विचारताच तो पळून गेला. ही बाब त्यांनी सकाळी त्याचे वडील मुजीब कुरेशी यांना सांगितली असता, त्यांनी तो हुल्लड पोरगा आहे. त्याच्या नादाला कशाला लागता असे सांगितले. याबाबत लक्ष्मी मुसळे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दानिश मुजीब कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीसाठी आलेला व्यक्ती गेला पळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:21 IST