शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ते विकासावर बोलतच नाहीत, सकाळी नऊपासूनच टीकेचे भोंगे सुरू होतात - फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 09:57 IST

परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

परभणी : महायुतीसमोर विरोधकांचा टिकाव लागत नसल्याने ते दिशाहीन वक्तव्य करीत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, सकाळी नऊ वाजेपासून भोंगे सुरू ठेवून आमच्यावर टीका करीत आहेत. अशाने परिवर्तन होणार नाही, त्यासाठी विकासाबाबत प्रश्न मांडत अपेक्षित सूचना कराव्यात, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराेधकांवर केली. 

परभणीतील कृषी विद्यापीठात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. मराठवाड्यातील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी वॉटरग्रीड हा प्रकल्प हाती घेतला होता. परंतु, मविआ सरकारकडून अपेक्षित गती मिळाली नाही. परंतु, आता यासाठी २० हजार कोटींसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असून यात प्रामुख्याने गोदावरी खोऱ्यातून पाणी आणत मराठवाड्यातील महत्त्वाचे प्रकल्प एकमेकांना जोडणार आहे, असे फडणवीस म्हणाले.  

‘ऑनलाइन’वरून त्यांना ‘लाइन’वरच आणले - मविआ सरकारच्या काळात कायम घरात बसून ऑनलाइनवर राज्याच्या कारभार पाहणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणण्याचे काम केले. त्यांना असा झटका आमच्या माध्यमातून मिळाला की, ते थेट लाइनवरच आल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. - सरकार पडणार मुख्यमंत्री बदलणार, असे बोलले जात असले तरी तशी शक्यता आता तर नाहीच. कारण अजित पवारांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे महायुती अधिक सक्षम झाल्याने त्याचा परिणाम आगामी काळातसुद्धा दिसून येईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक राज्यात अफवा पसरवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. परंतु, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे खंबीर नेतृत्व नसल्याचे जगाने मान्य केले आहे. त्यामुळे या विकासाच्या प्रक्रियेत इतरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस