शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगावर एक छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 13:52 IST

तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर शासन भर देत आहे. असे असताना तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मनरेगाचे यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर एकही काम सुरू नाही अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

विषेश म्हणजे 2018 - 19 या वर्षात या ग्रा प आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही, पर्यायाने गेल्या सहा महिण्यात या गाव कार्यक्षेत्रात योजनेवर छदाम ही खर्च झाला नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास अली आहे. त्यामुळे योजनेच्या कामाकडे प्रशासकीय यंत्रणा किती उदासीन आहे ही बाब दिसून येते. 

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विविध 29 प्रकारच्या कामाचा समावेश केला आहे, तसेच अकरा कलमी कार्यक्रम ही हाती घेतला आहे, दर वर्षी 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत पुढील वर्षी च्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जातात, मात्र वास्तवात हे नियोजन कागदावर राहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

मनरेगा योजने अंतर्गत 50 टक्के कामे यंत्रणा स्तर आणि 50 टक्के कामे जिल्हा परिषद स्तरावर म्हणजेच ग्रा प स्तरावर केली जातात.मागील काही वर्षात ग्राप स्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरीची घेतली जात आहेत.ग्राप कढूनही त्याच कामाची मागणी होत आहे.यंत्रणा स्तरावर शेत रस्ते, नालासरळीकर , वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण , शेततळी, तुती लागवड या कामाचा समावेश आहे.यंत्रणा स्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागा मार्फत कामे केली जातात.

मात्र, तालुक्यातील मनरेगा योजनेच्या कामात या सर्वच यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे 21 गावात मनरेगा योजनेचे एकही यंत्रणेचे काम सुरू नाही. गावात मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांचे स्थलांतर वाढले आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने या गावात मनरेगाची  कामे सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

गावांची यादी : 

टॅग्स :parabhaniपरभणीgovernment schemeसरकारी योजनाfundsनिधी