शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच

By राजन मगरुळकर | Updated: August 5, 2023 11:47 IST

महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच

परभणी : तक्रारदार यांच्या आईच्या नावाने महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर हस्तांतरण करून देण्यासाठी मनपाच्या प्रभाग समिती क अंतर्गत कार्यरत असलेल्या एका कर निरीक्षकाने साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या कर निरीक्षकाविरुद्ध परभणी एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा कारवाई केली. यात तक्रारदाराकडून सदरील साडेचार हजारांची लाचेची रक्कम आरोपी लोकसेवकाने स्वीकारली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री साडेदहा वाजता सुरू होती.

मनपा प्रभाग समिती क चे कर निरीक्षक पठाण शेरखान नूरखान असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या आईने परभणी महापालिका हद्दीत स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. ही स्थावर मालमत्ता त्यांच्या आईच्या नावावर हस्तांतरणाचे काम करून देण्यासाठी आरोपी लोकसेवक याने तक्रारदाराकडे एकूण ११ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात सहा हजार पाचशे रुपये शासकीय फीस असेल व उर्वरित रक्कम चार हजार पाचशे रुपये हे टेबलावर द्यावे लागतात, असे सांगून लाच मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली.

त्यानुसार शुक्रवारी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडे ११ हजारची मागणी केली. त्यातील सहा हजार पाचशे रुपये शासकीय फीस असेल व उर्वरित चार हजार पाचशे रुपये रक्कम ही सहीसाठी टेबलावर द्यावी लागते, असे म्हणून लाच मागणी केली. सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक शेरखान पठाण यांनी मागणी केलेली फी व लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी तक्रारदार हे पंचासह प्रभाग समिती क च्या कार्यालयात गेले तेथे त्यांनी ११ हजार रुपयांची एकूण रक्कम स्वीकारली.

पावती १० दिवसांनी मिळेलयामध्ये तक्रारदार याने आरोपी लोकसेवकास सहा हजार पाचशे रुपयांची शासकीय पावती मागितली असता सदर पावती दहा दिवसानंतर मिळेल, असे सांगितले. आरोपी लोकसेवक यास लाचेचा रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नवा मोंढा ठाण्यात सुरू आहे.                                                       

यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक ईप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद हनुमंते, रवींद्र भूमकर, सीमा चाटे, अनिरुद्ध कुलकर्णी, अतुल कदम, मो.जिब्राइल, शेख मुख्तार, राम घुले, कदम यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणी