शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी शिर्डीच्या नावाखाली इंदूरला नेऊन लग्न लावले, अल्पवयीन मुलीने मांडली कैफियत

By राजन मगरुळकर | Updated: June 24, 2023 18:19 IST

इंदूर येथून पळ काढून थेट परभणी गाठली; मुलीची आई-वडिलांसह पाच जणांविरुध्द फिर्याद

परभणी : एका अल्पवयीन मुलीला तिचे आईवडील शिर्डीला दर्शनासाठी जाऊ, असे म्हणून घरातून घेऊन गेले. यानंतर शिर्डीत न जाता मनमाड येथून थेट इंदूर गाठून मुलीच्या आईवडिलांनी तिच्या मर्जीविरुद्ध मुलीचे लग्न लावले. हा धक्कादायक प्रकार १८ मे रोजी घडला आहे. लग्नानंतर सदरील अल्पवयीन मुलीने इंदूर येथून पळ काढून थेट परभणी ग्रामीण पोलिस ठाणे गाठले आणि सदरील प्रकरणात आईवडिलांसह अन्य पाच जण सहभागी असल्याचा गुन्हा २२ जून रोजी नोंदविण्यात आला.

याबाबत पोलिस सूत्रांची माहिती अशी, परभणी तालुक्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी मागील वर्षी आठवी इयत्तेत शिकत होती. घटनेनुसार, ४ मे रोजी रात्री अल्पवयीन मुलीला तिच्या आईवडिलांनी उद्या रेल्वेने शिर्डीला दर्शनासाठी जाऊ, असे सांगितले. त्यानुसार ५ मे रोजी मुलगी तिच्या आईवडिलांसमवेत गावातून परभणी स्थानकावर आली. स्थानकावर तिच्या आईवडिलांच्या ओळखीचा एक इसम व त्याची पत्नी त्यांना भेटले. हे सर्व जण रेल्वेने मनमाड येथे गेले. तेथून शिर्डीला न जाता खंडवा मार्गे इंदूर येथे ६ मे रोजी पहाटे पोहोचले. सोबत आलेल्या इसमाच्या नात्यातील एका मुलीच्या घरी सर्व जण गेले. तेथून परिसरातील काही ठिकाणी फिरून ते परत इंदूर येथे आले. १८ मे रोजी सायंकाळी सदरील अल्पवयीन मुलीला दोन जणांनी बाहेर फिरायला नेले व तेथून दोन हार विकत घेऊन घरी परतले.

लग्नाचे वय नाही, मी लग्न करणार नाहीयानंतर अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी तुझे आता लग्न करायचे आहे, असे सांगितले. त्यावर अल्पवयीन मुलीने मला आताच लग्न करायचे नाही. माझे लग्नाचे वय नाही, असे आईवडिलांना व इतर सर्वांना सांगितले. परंतु, आईवडिलांनी मुलीचे ऐकले नाही. त्याच दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीचे घरातच एकाशी लग्न लावले. या लग्नानंतर सदरील लग्न लावलेला इसम त्याच्या घरी निघून गेला.

...अन् आईवडील गावाकडे परतलेयामध्ये २१ मे रोजी इंदूर येथील संबंधित लग्न लावलेल्या इसमाच्या घरी अल्पवयीन मुलीला सोडून मुलीचे आईवडील गावाकडे परतले. या सर्व प्रकारानंतर सुमारे एक महिना मुलीने तेथे काढला.

मुलीने काढला इंदूर येथून पळअखेर २१ जून रोजी सदरील अल्पवयीन मुलगी संबंधितांच्या घरातून कोणाला काही न सांगता ट्रॅव्हल्सने परभणीत परतली. तिने थेट पोलिस ठाणे गाठून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी २२ जून रोजी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून मुलीचे आईवडील व अन्य पाच जण यांच्यावर गुन्हा नोंद झाला. परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे करीत आहेत.

आरोपी फरार, शोध सुरुसदरील घटनेत परभणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला महिलागृहात पाठविले आहे. सद्य:स्थितीत या घटनेतील सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.- रागसुधा आर., पोलिस अधीक्षक.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी