शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

घराचा दरवाजा तुटला नाही, चोरट्यांनी गेटमधील दुचाकी पळवली; दुसरीकडून २ लॅपटॉपही लंपास

By ज्ञानेश्वर भाले | Updated: December 27, 2023 16:48 IST

सेलू शहरात दोन ठिकाणी झाल्या चोरीच्या घटना

सेलू (परभणी) : सेलू शहरात रविवारी रात्री आनंद नगर तर सोमवारी रात्री शासकीय विश्रागृह परिसरात एका खाजगी कोचींग क्लासेस मध्ये चोरीची घटना घटली अशी माहिती पुढे आली आहे.या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये कैद झाले आहेत.                   सेलू शहरातील आनंद नगर मधील  सिद्धेश्वर सुभाष राऊत यांचे घरी २४ डिसेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गेटमधून प्रवेश करीत घर फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. अखेर गेट मध्ये लावलेली शाईन कंपनीची मोटरसायकल (क्र. एम एच.२१ बी.एस.३९९४) किंमत ६५ हजार रूपये अशी दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली आहे.

दुसऱ्या घटनेत सोमवारी रात्री शासकीय विश्रामगृह परिसरात रस्त्यावरील एका खाजगी कोचींग क्लासेस मधील लॅपटॉप ,रोख रक्कम २५ हजार व ईतर साहित्याची चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे या घटनेतील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दरम्यान या दोन्ही ठिकाणच्या घटनास्थळी प्रभारी पो.नी.विजय कांबळे,पोलीस कर्मचारी व स्थागुशाचे पोउपनी गोपीनाथ वाघमारे, पोलीस हवालदार विलास सातपुते, मधुकर ढवळे,विष्णु चव्हाण  यांनी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी एका घटनेतील अज्ञात चोरट्यांविरूध्द सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे तर दुसऱ्या घटनेतील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती पुढे आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी