शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 12:56 IST

गंगाखेडजवळील प्रकारात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेडहून परभणीकडे जाणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्यास अडवून त्याला चाकूचा धाक दाखवत १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी लांबविल्याची घटना १९ जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास गंगाखेड- परभणी रस्त्यावरील खळी पाटीजवळ घडली.

जिंतूर येथील सचिन रघुनाथ टाक हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा होलसेल व्यवसाय करतात. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांना ते दागिने पुरवितात. १९ जानेवारी रोजी ते दिवसभर गंगाखेड येथील बाजारपेठेत व्यवसायाच्या निमित्ताने फिरले. सायंकाळी एका खासगी प्रवासी वाहनात बसून ते परभणीकडे निघाले होते. याच दरम्यान, पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी हे खासगी प्रवासी वाहन अडविले. सचिन टाक यांना खाली बोलावून चाकूचा धाक दाखवित. त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, याप्रकरणी बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास सचिन टाक यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गळ्याला चाकू लावून चोरट्यांनी बॅगमधील ३५० ग्राॅमचे सोन्याचे कुंदन, बाळ्या, डोरले, ओम असे १२ लाख ७४ हजाराचे सोन्याचे दागिने व ८८ हजार रोख रक्कम चोरट्यांनी लांबविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.

बहिणीची छेड काढल्याचा केला बनावसचिन टाक हे ज्या खासगी वाहनाने परभणीकडे निघाले होते, नेमके तेच वाहन चोरट्यांनी मोटारसायकल आडवी लावून थांबविले. वाहन थांबविल्यानंतर सचिन खुडे यांना खाली ओढले. आमच्या बहिणीची याने छेड काढली आहे. तुमचा काहीही संबंध नाही, असे इतर प्रवाशांना सांगत त्यांनी टाक यांना खाल उतरवून वाहनास पुढे जाण्यास सांगितले. त्यानंतर टाक यांच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची लूट केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी